दुमका : लग्नात छोटे मोठे रुसवे-फुगवे झाल्याचे तुम्ही ऐकलंच असेल, कोत्याही नातेवाईकाचं मान-पान मनासारखा झाला नाही की, ते रागावून बसतात. या सगळ्याबद्दल तुम्ही पाहिले किंवा ऐकलं देखील असेल. परंतु झारखंडची उपराजधानी दुमका येथून एक अशी आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये वरातीला न आल्यामुळे भावोजी आणि मेव्हणा यांच्यात जोरदार वाद झाला आणि हा वाद इतका मोठी झाला की, तो थेट रुग्णालया पर्यंत पोहोचला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही विचार करत असाल, की नक्की असं काय झालं असावं, ज्यामुळे हा वाद इतका मोठा झाला असावा...


खरं तर हे प्रकरण दुमकाच्या नगर पोलीस स्टेशन परिसरातील दुधनी कुरुवाशी संबंधित आहे, जिथे अरुण साह यांचा मेहुणा बैजू शाह यांचा मुलगा राजकुमार शाह याचा विवाह होणार होता. देवघर जिल्ह्यातील दुमका ते पालोजोरीपर्यंत त्याच्या लग्नाची वरात जाणार होती.


बैजूने आपल्या भवोजीला मिरवणुकीत जाण्याचा आग्रह केला. परंतु वयाचे कारण देत त्यांनी नकार दिला.


अरुण शहा यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मेहुण्याला एवढेच सांगितले की, 'माझे वय 60 वर्षे आहे, ज्यामुळे मी वरातीमध्ये नाचू शकत नाही, ते मला जमणार नाही.'


यावर संतापलेल्या मेव्हण्याने, त्याला जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते मारहाण करण्यावर उतरले. 


बैजू दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळी अरुण शहा यांच्या बचावासाठी त्यांची मोठी बहिण गीता देवी आल्या, तेव्हा त्यांना देखील बैजूने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारामारीत अरुण साह यांचा मुलगा राहुल कुमारही जखमी झाला.


हे संपूर्ण प्रकरण शहर पोलीस ठाण्यात पोहोचले


मारहाणीचे हे संपूर्ण प्रकरण शहर पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. फुलो झानो मेडिकल कॉलेज रुग्णालयात जखमींची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी नितीश कुमार यांनी सांगितले की, त्यांनी मारहाणीच्या प्रकरणा खाली हे प्रकरण नोट केलं आहे आणि त्याची तपासणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.