कोण म्हणतं गाढवाला डोकं नसतं, एकदा हा VIDEO पाहाच
हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हा काय म्हणाल खरंच गाढव `बुद्धू की बुद्धीमान`
मुंबई : तुम्ही गाढवाची लहानपणी गोष्ट ऐकली असेल. गाढवाच्या पाठीवर मीठ दिलं जातं तो चुकून नदीमध्ये पडतो पाठीवरचं ओझं हलकं होतं. असं तो रोज करायचा एक दिवस मालकाने त्याच्या पाठीवर कापूस दिला आणि तो ही ट्रिक वापरून फसला. अशी ती गोष्ट होती. मात्र आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गाढवाला नेहमी बुद्धू म्हटलं जातं. ते सांगेल तेवढंच काम अगदी योग्य पद्धतीनं करतं. तिथे स्वत:चं डोकं लावत नाही. ओझी वाहून नेण्यात तर त्याचा हातखंडा असतो. याच गाढवाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की गाढवं काठीवरून उडी मारून जात आहेत. काळ्या रंगाचं गाढव मात्र काठीवरून उडी मारून जात नाही. ते आधी काठीचा अंदाज घेतं. त्यानंतर ती काठी तोंडाने उचलून खाली टाकतं आणि पुढे निघून जातं.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ते गाढव किती बुद्धीवान असावं असंही एक क्षण वाटतं. सोशल मीडियावर या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत.