Monkey Video : Smart माकडाने क्षणात सोडवलं कोडं, पाहा तुम्हाला जमलं असतं का?
Monkey Puzzle Video : माकडं पहिल्यांना विचार करतात आणि लगेच आपलं डोकं चालवून पझलचं उत्तर देखील शोधतात. एक माकड पुढे सरकून...
Monkey Video : प्रत्येकात काही ना काही टॅलेंट असतं, असं म्हणतात. अनेकांची बुद्धीक पातळी अफाट लेवलची असते. तर प्राण्यांच्या करामती देखील भन्नाट पातळीवरच्या असतात. विशेषत: माकड... माकडाचे (Monkey) माकडचाळे आपण पाहिले असतील, पण या माकडचाळ्यांना टॅलेंटच्या मोजपट्टीवर मोडलं जात नाही. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral) होताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ अनेकजण शेअर करताना दिसत आहेत.
माकडांशी संबंधित असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये त्यांची बुद्धी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडीओमध्ये माकड एक अवघड कोडं सहजरित्या सोडवताना दिसतोय. व्हिडीओमध्ये दिसतंय की... एक लोखंडी दरवाजासारखा पझल गेम ठेवला आहे. त्याठिकाणी माकडांची टोळी येते. त्यावेळी माकडं या गेमकडे (Monkey Puzzle Video) कुतूहलाने पाहतात.
आणखी वाचा - बाई थोडा धीर धर की! लग्नमंडपातच वधूने वराला केल Kiss, वराची झाली अशी अवस्था
माकडं पहिल्यांना विचार करतात आणि लगेच आपलं डोकं चालवून पझलचं उत्तर देखील शोधतात. एक माकड पुढे सरकून दोरी खेचतो. त्यामुळे पझलमधील चेंडू खाली होते. त्यानंतर आणखी एक लॉक उघडल्यानंतर गेम पुर्ण होणार असतो. विचार न करता माकड डावपेच खेळतो आणि जिंकतो सुद्धा...
पाहा व्हिडीओ-
इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल -
दरम्यान, माकड ज्या पद्धतीनं बॉल सहजपणे सोडवू शकतो आणि बाहेर काढू शकतो, ते पाहताना अनेकांना कौतूक वाटतंय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर monkeyvidz नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. तर कित्तेकांनी या व्हि़डीओवर कमेंट देखील केली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही माकडाचं कौतूक वाटेल.