बाई थोडा धीर धर की! लग्नमंडपातच वधूने वराला केल Kiss, वराची झाली अशी अवस्था... Video होतोय तुफान व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 28, 2022, 05:59 PM IST
बाई थोडा धीर धर की! लग्नमंडपातच वधूने वराला केल Kiss, वराची झाली अशी अवस्था... Video होतोय तुफान व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. नेहमीच हे व्हिडीओ हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. कधी कधी काही व्हिडीओ तर आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यात सोशल मीडियावर वधू-वरांचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. काही मजेदार व्हिडिओ असतात तर काहींमध्ये विचित्र घटना पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. ज्यामध्ये हे जोडपं कुटुंब आणि पंडितजींसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्यात मागे हटत नाही. इतकचं काय तर त्यांनी केलेल्या कृत्यानं सगळ्यांनाच धक्काबसला आहे.

मंडपात बसून वधू-वरांनी एकमेकांचे चुंबन घेतले (Wedding Video)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की वधू आणि वर लग्नाच्या मंडपात एकत्र बसले आहेत. समोर पंडितजींनी गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगितले आणि मग थांबले. समोर बसलेला वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत आहे आणि वधूच्या मागे उभी असलेली एक मुलगी त्याला मदत करते. या दरम्यान वधू वराकडे पाहत राहते आणि नंतर अचानक ती वराला गालावर किस करते. वरालाही कल्पना नसते की वधू त्याला किस करेल. मात्र, वधूनं वराला किस करताच घेताच तो स्तब्ध झाला आणि बघतच राहिला. मात्र, किस केल्यानंतर दोघेही हसायला लागले. (the bride started kissing in front of panditji the groom became red with shame video viral) 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत

रोमँटिक क्षण सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हे कपल आणि त्यांच्या सभोवतालचे सर्वजण हसले. कॅमेरामननं हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असून हा व्हिडीओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. नेटिझन्सना हा व्हिडिओ अतिशय गोड असल्याच काहींनी म्हटलं आहे. अनेकांनी कपल गोल असल्याचे म्हटले. तर, अनेक नेटकऱ्यांनी असे म्हटले की हे भारतीय परंपरांच्या विरोधात आहे आणि मंडपातील पंडितांसमोर असे करू नये. सगळ्यात गंमत म्हणजे खूप कमी लोकांनी त्यांना किस करताना पाहिले आणि मग ज्यांनी त्याला पाहिले ते सगळे हसायला लागले. या व्हिडिओवर शेकडो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. (Trending Video)