Snake Lion Video: नाद करायचा नाय! सापाशी नडणं बछड्याला आयुष्यभर लक्षात राहिल
Snake Lion Video: टेरेटरी (Lion Territory) हा प्रकार प्राण्यांना खूपदा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या राज्यात हे प्राणी कधीच दुसऱ्या प्राण्याला येऊ देत नाहीत.
Snake Lion Video: आपण शहरी लोकं जसे कधी खेळीमळीनं कधी भांडण करत एकमेकांसोबत वावरतो त्याचप्रमाणे जंगलातील प्राणीही (Jungle Viral Videos) असतात. कधी ते एकमेकांसोबत खेळीमेळीनं राहतात किंवा कधी तेही एकमेकांच्या जीवावर उठतात. सोशल मीडियावर (Social Media Snake Videos) सापाचे व्हिडीओज हे अनेकदा व्हायरल होत असतात. कधी साप आणि मुंगूसची फायटिंग (Snake - Mongoose Fight) आपण पाहतो तर कधी त्यांच्यातील जोरदार मारमारी सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये यावेळी सापाशी चक्क सिंहाच्या बछड्यानंच (Lion Cub) पंगा घेतला आहे. सापाशी पंगा घेणं या इवल्याश्या सिंहाच्या पिल्लांला महागात पडलं आहे. या सिंहाचे पुढे काय झालं पाहून तर तुम्हालाही हासू आणि आसू आल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा व्हिडीओ सगळ्या सोशल साईट्सवर तुफान व्हायरल होतो आहे. (Snake and lion cub fight video goes viral netizens reacts with funny comments)
ज्याप्रमाणे आपल्या मानवांमध्येही आपल्याला आपण जग्गजेते आहोत असं वाटतं असतं त्याप्रमाणेच प्राण्यांमध्येही ही भावना असते. तु माझ्या जागेत कसा आला यावरूनही प्राण्यांमध्ये मोठी झुंबड लागलेली असते. टेरेटरी (Lion Territory) हा प्रकार प्राण्यांना खूपदा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या राज्यात हे प्राणी कधीच दुसऱ्या प्राण्याला येऊ देत नाहीत. अशावेळी त्यांच्यातही मोठी भांडणं होतात, मारामाऱ्या होतात आणि अनेकदा त्यांच्यात नक्की काय होईल याबद्दलही काही सांगता येत नाही त्याच्या कधी कुठल्या कारणावरून झुंबड उडेल याचाही काही नेम नाही.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सापा जमीनीवर शांत बसला आहे. तेवढ्यात तिथे सिंहाचा बछडा येतो. सिंहाच्या बछड्यानं सापाला हात लावायचा आणि त्याच्यासोबत मस्ती करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात ते सापाला अजिबात आवडलं नाही आणि त्यामुळे त्यानं फटकन आपले अंग हलविले आणि सिंहाच्या तोंडावरच चालून गेला. त्यानं जोरात सिंहाचा चावा (Snake Bite) घातला आणि जोरात त्याला आपल्यापासून बाजूला केले. तेवढ्यात मारलेल्या चाव्यानं सिंहानं आपलं अंग काढून घेतले. परंतु या व्हिडीओनं सध्या सगळ्यांच्याच अंगावर शहारा आणला आहे.
wildmaofficial या इन्टाग्राम अकांऊवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओच्या शेवटी तुम्ही हेही पाहू शकता की, घाबरलेला सिंह तिथून पळ काढतो आणि साप मात्र पुन्हा एकदा आपल्या जागी आरामात बसतो. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही तेच लिहिलं आहे की, आज सापानं सिंहाच्या बछड्याला चांगला धडा शिकवला.
याखाली अनेक लोकं तऱ्हेतऱ्हेचे कमेंट्स करत आहेत. त्यात काहींनी म्हटलंय की, बापरे, सिंहापेक्षा सापालाच जास्त राग येतोय. तर काहींनी म्हटलंय की, आता परत सिंह (Snake - Lion Video) सापाच्या नादाला जाणार नाही.