Sonali Phogat Murder Case: भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगटच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गोव्यातून तपासासाठी गुरुग्रामला आलेल्या पोलिसांनी सोनालीच्या फ्लॅटची बराच वेळ झडती घेतली. झडतीदरम्यान अनेक महत्त्वाचा सुगावा पोलिसांच्या हाती लागला आहे. गोवा पोलीस सध्या गुरुग्राममध्ये आहेत. सोमवारी पोलीस अधिकारी सोनालीच्या कार्यालयाची झडती घेतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा पोलिसांनी सोनाली फोगटच्या गुरुग्रामच्या सेक्टर 102 मधील फ्लॅटची झडती घेतली आहे. यादरम्यान दागिने, घड्याळ, पासपोर्ट याशिवाय अनेक महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी अद्याप या गोष्टींचा खुलासा केलेला नाही. यासोबतच गोवा पोलिसांनी सोनालीच्या पीए सांगवानच्या घराचीही झडती घेतली आहे.


गोवा पोलिसांच्या पथकाने हरियाणातील रोहतक येथील सुधीर सांगवान याच्या घराची झडती घेतली आहे. सूत्रांनी सांगितले की गोवा पोलिसांचे पथक रविवारी सांगवानच्या घरी पोहोचले आणि चौकशीनंतर पुढील तपासासाठी गुरुग्रामला रवाना झाले. सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी सांगवान, सुखविंदर सिंग आणि अन्य तिघांना अटक केली आहे.


सांगवानने गुरुग्राममध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता, जिथे गोवा पोलीस पुढील तपास करणार आहेत. सोनालीची हत्या झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीवर फोगटचे कुटुंबीय ठाम आहेत. गोवा पोलिसांचे पथक हरियाणामध्ये तपास करत असताना आज पाचवा दिवस आहे. तपासासंदर्भात हे पथक बुधवारी हिसार येथे पोहोचले, त्याअंतर्गत त्यांनी फोगट यांच्या संत नगर येथील फार्महाऊस आणि घराला भेट दिली. टीमने फोगट आणि सांगवान यांच्या बँक खाती आणि मालमत्तेशी संबंधित तपशीलही गोळा केला.


सूत्रांनी सांगितले की गोवा पोलीस फोगटच्या नावावर असलेल्या जमिनीसह मालमत्तेचेही मूल्यांकन करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा मालमत्तेच्या अँगलने तपास करत आहेत. फोगट आणि इतरांनी 22 आणि 23 ऑगस्टच्या मध्यरात्री गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटमध्ये पार्टी केली होती. फोगट (43) यांना गोव्यात आल्यानंतर 23 ऑगस्ट रोजी उत्तर गोवा जिल्ह्यातील रुग्णालयात मृत परिस्थितीत आणण्यात आले. गोवा पोलिसांनी दोन साथीदार सांगवान आणि सिंग यांच्यावर हत्येचा आरोप लावला आहे.