Sonia Gandhi Birthday: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि काँग्रेसच्या (Congresss) अनेक नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली. सोनिया गांधी राजस्थानमध्ये कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करणार आहेत. सोनिया गांधी गुरुवारी सवाई माधोपूर येथे पोहोचल्या आहेत. 


टायगर सफारीचा लुटला आनंद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये आहे. दरम्यान, सोनिया गांधी गुरुवारी सवाई माधोपूरला पोहोचल्या. येथे सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सवाई माधोपूर, रणथंबोर येथील जोगी महलला भेट दिली. गांधी परिवारानेही जिप्सीमध्ये बसून रणथंबोर टायगर सफारीचा आनंद लुटला. सर्वांनी जंगल सफारी केली आणि वाघांच्या हालचाली टीपल्या. नंतर गांधी कुटुंब हॉटेल शेरबागमध्ये माघारी परतले.  त्यांचा वाढदिवस शेरबागमध्ये साजरा होणार आहे. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाची हॉटेलमध्येही तयारी सुरु आहे. 


जोगी महालाशी गांधी कुटुंबाचा जुना संबंध


रणथंबोर येथील जोगी महालाशी गांधी कुटुंबाचा जुना संबंध आहे.1987 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी हेही येथे आले होते. त्यावेळी राजीव गांधी यांच्यासोबत मेगास्टार बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चनही उपस्थित होते. सर्वांनी येथे सात दिवस घालवले होते. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या वाढदिनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोनिया गांधी सध्या राजस्थानमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 




नितीन गडकरी यांनीही दिल्यात शुभेच्छा



श्रीमती सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सोनिया गांधीजी तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बिवी यांनी ट्विट केले की, एका महिलेने या देशाच्या सेवेत खूप काही गमावले आहे, तरीही ती या देशाच्या प्रगतीसाठी खंबीरपणे उभी राहिली आणि प्रत्येक सुख-दु:खात काँग्रेस पक्षाचे मार्गदर्शन केले. आमच्या नेत्या सोनिया गांधींजी यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीही सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.