बंगळुरू : सिद्धगंगा मठाचे प्रमुख श्री श्री शिवकुमार स्वामी यांचं वयाच्या १११ व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन जालं. कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या म्हणण्यानुसार, शिवकुमार स्वामी यांनी सकाळी ११.४४ वाजता अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमवेत देशातील अनेक राजकीय नेत्यांनी स्वामीजीच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वामीजींच्या निधनानंतर कर्नाटक सरकारकडून तीन दिवसांचा राजकीय शोक घोषित करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, स्वामीजींवर मंगळवारी बंगळुरूमध्ये अंत्यसंस्कार पार पडतील. मंगळवारी सर्व शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालय बंद राहील. 




येडियुरप्पांनी घेतलं अंत्यदर्शन


मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ काळापासून स्वामीजी फुफ्फुसांच्या आजाराशी झगडत होते. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. स्वामीजीच्या देहावसनाची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण कर्नाटकात शोकाकूल वातावरण निर्माण झालंय. कुमारस्वामी, माजू मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, एम बी पाटील, के जे जॉर्ज, केंद्रीय मंत्री सदानंद गौडा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहचले.