पटना : एसएसबीच्या सुरक्षा रक्षकांनी बिहारच्या  किशनगंज भागातून आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीला ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून एका दुर्लभ जातीची पाल जवानांना मिऴाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसएसबीच्या जवानांच्या मते या पालीच्या पावडरचा उपयोग मनुष्याचा स्टेमिना वाढवण्यासाठी आणि ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी आणि शुगरचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात या एका पालीची किंमत कोटींच्या घरात आहे. या जातीच्या पालींची निर्यात देखील केली जाते.



जवानांच्या 41व्या बटालिनच्या जवानांनी पश्चिम बंगालपासून काही किमी अंतरावर नक्षलवादी भागातून या टोळीला अटक केली. एसएसबी बटालियनचे कमांडर राजीव राणांनी दोन संदिग्ध लोकांना पाहिलं. त्यांना आवाज दिल्यानंतर त्यांनी पळ काढला. पण त्यांची कसून चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं आणि एकच खळबळ माजली. आंतरराष्ट्रीय बाजारात या पालीची किंमत एक कोटींच्या घरात आहे. Tokay lizard असं या पालीचं नाव आहे. 


एसएसबीच्या जवानांच्या माहितीनुसार ही पास चीनला पाठवण्याची तयारी होती. चीनमध्ये या पालीची मागणी मोठी आहे. या पालीसाठी तेथे हवी ती किंमत दिली जाते.