Stock Market Today: निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शेअर बाजारात अनपेक्षित बदल; Sensex - Nifty कितीवर? पाहाच
Stock Market Today: चार दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर शेअर बाजार तेजीने (share market teji) उघडला आहे. परंतु आजच्या गुजरात आणि हिमाचल निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये (sensex and nifty) स्थिरताच दिसते आहे.
Stock Market Today: चार दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर शेअर बाजार तेजीने (share market teji) उघडला आहे. परंतु आजच्या गुजरात आणि हिमाचल निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये (sensex and nifty) स्थिरताच दिसते आहे. सेन्सेक्स 94 अंकांच्या वाढीसह 62504 च्या पातळीवर उघडला आहे. निफ्टी 10 अंकांच्या वाढीसह 18570 च्या पातळीवर उघडला आहे. परंतु सध्या सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये स्थिरता पाहायला मिळते आहे. गेल्या चार दिवसात तरी सेन्सेक्स निफ्टीत घसरण पाहायला मिळाली परंतु त्यानंतर सेन्सेक्स निफ्टीनं थोडीफार उसळी घेत उच्चांक गाठायला सुरूवात केली आहे. आजही ही वाढ दिसत असली तरी निफ्टी आणि सेन्सेक्सची तुलनात्मक वाढ पाहिली तर दोघेही स्थिरस्थावर आहेत. त्यातून बॅंक निफ्टीमध्ये मोठा उच्चांक पाहायला मिळाला आहे. परंतु शेअर मार्केटमध्ये निवडणूकांच्या (share market today) पार्श्वभुमीवर फारसा उत्साह नाही. (Stock Market Today gets flats yet rises with positive margins compare to last four days Gujarat himachal Asselmbly Election Result 2022)
आवर्जून वाचा - LIVE Himachal Pradesh Election Result 2022 | भाजप 34, काँग्रेस 33 जागेवर आघाडी
कोणते शेअर्स आहेत वर, आणि कोणते खाली?
लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि बजाज फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स वाढले आहेत. पॉवरग्रीड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सवर दबाव आहे. आज रुपया 20 पैशांच्या वाढीसह 82.27 च्या पातळीवर उघडला. आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (gujrat and himachal pradesh) निकाल लागणार आहेत तेव्हा अंतिम निकाल आल्यानंतर या घटनेकडे बाजाराचे लक्ष वेधलेले असेल.
काय आहे बाजाराची स्थिती ?
दलाल स्ट्रीटने (dalal street) गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा बारकाईने मागोवा घेतल्याने देशांतर्गत बाजारांनी गुरुवारी चार दिवसांच्या घसरणीचा सिलसिला कमी केला. बेंचमार्क निर्देशांक - BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी 50 - आज 62,500 आणि 18550 च्या वर उघडले आहेत.
आवर्जून वाचा - LIVE Gujarat Election Result 2022 : गुजरातमध्ये भाजप - 123, काँग्रेस - 42 तर आप - 3
बाजार उघडताना बीएसई सेन्सेक्स 93.7 अंकांनी किंवा 0.15 टक्क्यांनी वाढून 62,504.4 वर तर एनएसई निफ्टी 50 10.3 अंकांनी किंवा 0.06 टक्क्यांनी वाढून 18,570.8 वर होता. त्याचप्रमाणे 12 शेअर्सचा बँकिंग निर्देशांक 43.6 अंकांनी आणि 0.1 टक्क्यांनी वाढून 43,142.30 वर पोहोचला.
व्यापक बाजारपेठेत निफ्टी स्मॉलकॅप 100 10,066.70 वर उघडला जो 36.65 अंकांनी म्हणजेच 0.36 टक्क्यांनी वाढला होता आणि निफ्टी मिडकॅप 100 32,390.30 वर उघडला होता जो 82 अंकांनी वाढला होता जो 0.25 टक्के होता.