LIVE Himachal Pradesh Election Result 2022 | काँग्रेस 38, भाजपला 27 जागा

 LIVE | Himachal Pradesh Election Result 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा, काँग्रेस 38 तर भाजप 27 जागांवर आघाडीवर

LIVE Himachal Pradesh Election Result 2022 | काँग्रेस 38, भाजपला 27 जागा

Himachal Pradesh Assembly Election Result Live Updates: हिमाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेसने बहुमताचा आकडा केला पार

 

8 Dec 2022, 13:22 वाजता

Himachal Election Result Update: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Himachal Pradesh Assembly Election Result 2022) काँग्रेसने (Congress) बहुमताचा आकडा पार केला आहे. सुरुवातीच्या निकालानुसार काँग्रेसने 38 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला (BJP) 27 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. याशिवाय 3 अपक्ष उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. यादरम्यान काँग्रेसने मोठी रणनिती आखली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस उमेदवार फुटण्याची भीती काँग्रेसला वाटत असून विजयी उमेदवारांना राजस्थानमध्ये हलवण्यात येणार आहेत. 

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या राजस्थानमधल्या सवाई माधोपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांच्याबरोबर प्रियंका गांधी यासुद्धा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका गांधी रणथंभोरमधल्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी राजस्थानमध्ये हिमाचल प्रदेशमधल्या काँग्रेसच्या विजयी उमेदवारांशी चर्चा करतील.

8 Dec 2022, 13:16 वाजता

हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - काँग्रेसची मोठी खेळी, विजयी उमेदवारांना राजस्थानला हलवणार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राजस्थानमध्ये दाखल

8 Dec 2022, 12:00 वाजता

हिमाचल प्रदेश विधानसभा - काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी हिमाचलमध्ये दाखल, विजयी उमेदवारांना राजस्थानमध्ये नेणार

8 Dec 2022, 11:54 वाजता

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केला बहुमताचा आकडा पार, काँग्रेसला 39 जागांवर आघाडी तर भाजप 26 जागांवर पुढे

8 Dec 2022, 11:35 वाजता

हिमाचल प्रदेश विधानसभा - काँग्रेसची जोरदार मुसंडी बहुमताचा आकडा पार 38 जागांवर आघाडी, तर भाजपला 27 जागा

आपला खातंही उघडता आलं नाही, 3 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर

8 Dec 2022, 10:52 वाजता

हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - जोगिंदरनगर मतदारसंघातून भाजपचे प्रकाश प्रेम कुमार आघाडीवर, काँग्रेसचे उमेदवार ठाकूर सुरेंद्र पाल यांच्यापेक्षा 6095 मतांनी पुढे, जयसिंहपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार यदविंदर गोमा भाजप उमेदवारापेक्षा 1391 मतांनी पुढे

8 Dec 2022, 10:39 वाजता

हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - अनुसार बंजारमधून अपक्ष उमेदवार हितेश्वर सिंह तर नालागढमधून अपक्ष उमेदवार केएल ठाकूर आघाडीवर, भाजप आणि काँग्रेसमधली चूरस पहाता अपक्ष उमेदवार किंग मेकर ठरणार

8 Dec 2022, 10:13 वाजता

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक - भाजप पुन्हा आघाडीवर 33 जागांवर पुढे, तर काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर

8 Dec 2022, 09:49 वाजता

हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, भाजचे प्रभारी विनोद तावडे आणि मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यात तातडीची बैठक

8 Dec 2022, 09:38 वाजता

हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - अनुसार बंजार मतदारसंघातून काँग्रेसचे खिमी राम आघाडीवर, निवडणुकीच्या काही दिवस आधीच खिमी राम काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. लाहोल स्पिती मतदारसंघात भाजपचे राम लाल मार्कंडेय पुढे