ओमायक्रॉनबाबत अमेरिकी अध्यक्षांच्या एका वक्तव्याने जगभरातील शेअर बाजार पुन्हा तेजीत
जागतिक संकेत बाजारासाठी मजबूत दिसत आहेत. आजच्या व्यवहारात बहुतांश आशियाई बाजारांमध्ये वाढ दिसून येत आहे. सोमवारी अमेरिकेच्या बाजारांमध्येही जोरदार रिकव्हरी दिसून आली.
मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत मजबूत दिसत आहेत. आजच्या व्यवहारात बहुतांश आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून येत आहे. सोमवारी अमेरिकेच्या बाजारांमध्येही जोरदार रिकव्हरी दिसून आली. सोमवारी Dow Jones इंडेक्स 237 अंकांनी वधारला आणि 35,135.94 च्या पातळीवर बंद झाला.
Nasdaq 291 अंकांनी वधारला. तर S&P 500 निर्देशांक 61 अंकांनी वाढून 4655 वर बंद झाला. अमेरिकेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की ओमायक्रॉन या नवीन प्रकारामुळे लॉकडाऊन अद्याप होणार नाही. त्यानंतर बाजारातील सेंटिमेंट मजबूत झाले आणि गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. प्रवासाशी संबंधित निर्बंध लादण्यासही त्यांनी नकार दिला आहे. कालच्या व्यवहारात मेगा कॅप टेक शेअर्समध्ये मोठी तेजी होती. प्रवासाशी संबंधित शेअर्सही वधारत बंद झाले.
आशियाई बाजारांबद्दल बोलायचे झाल्यास, SGX निफ्टी, Nikkei 225सह बहुतेक निर्देशांक तेजीत व्यवहार करत आहेत. युरोपीय बाजारातील FTSE, CAC आणि DAX सोमवारी वधारले.
आज चर्चेतील शेअर्स
आज गो फॅशन इंडियाचा शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. कंपनीचा IPO 135 पट सबस्क्राइब झाला होता. IPO साठी इश्यू किंमत 690 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. तत्व चिंतन फार्माने गुजरातमधील दहेज येथे 50,399.16 चौरस मीटर जमीन संपादित केली आहे.
F&O अंतर्गत NSE वर ट्रेडिंग
आजच्या व्यवसायात, NSE वर F&O मध्ये Indiabulls Housing Finance वर ट्रेडिंग होणार नाही.
FII आणि DII डेटा
विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) बाजारात सातत्याने विक्री करत आहेत. त्यांनी सोमवारी बाजारातून 3332.21 कोटी रुपये काढून घेतले. दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) सोमवारी बाजारात 4611.41 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
सोमवारचा व्यवहार
सोमवारी शेअर बाजारात खालच्या पातळीवरून जोरदार रिकव्हरी झाली. निफ्टी 17000 पार केल्यानंतर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 153 अंकांनी वधारला आणि तो 57261 च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 28 अंकांनी वाढून होऊन 17054 च्या पातळीवर बंद झाला.
सोमवारच्या व्यवहारात वित्तीय संस्था आणि IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. कोटकबँक, HCLTECH, TITAN, TCS, BAJFINANCE, BAJAJFINSV, RELIANCE, TECHM आणि HDFCBANK यांचा सर्वाधिक नफा कमावणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
-
हेही वाचा -
Stock to Buy Today | आज दमदार कमाईसाठी या शेअर्सवर करा ट्रेड; यादी वाचा
Sovereign Gold Bond | आजपासून सर्वात स्वस्त सोने खरेदीची संधी; जाणून घ्या प्रोसेस