Stocks in News | जगभरातील आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या स्टॉक्समध्ये असेल ऍक्शन; जाणून घ्या अनिल सिंघवींचे मत
स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिक नफा मिळविण्यासाठी योग्य स्टॉक निवडणे खूप महत्वाचे आहे.
मुंबई : स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिक नफा मिळविण्यासाठी योग्य स्टॉक निवडणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही योग्य आणि मजबूत स्टॉक निवडला असेल तर तुम्हाला निश्चित वेळेत नफा मिळेल. मात्र, आजच्या ट्रेडिंग सत्रात कोणते शेअर्स अॅक्शनमध्ये असतील किंवा कोणते स्टॉक्स खरेदी करता येतील, याची संपूर्ण यादी झी बिझनेसच्या विश्लेषकाने समोर आणली आहे. आजच्या सत्रात कोणते ट्रिगर महत्वाचे असतील आणि बातम्यांच्या आधारावर कोणते शेअर्स ऍक्शनमध्ये असतील ते पाहूया
आज 614 शेअर्सच्या प्राइस बँडमध्ये सुधारणा केली जाईल, यामध्ये टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्शन, न्यूलँड लॅब, ग्लोबस स्पिरिट, जुबिलंट इंड सारख्या समभागांचा समावेश आहे.
हिंदुस्थान झिंकच्या स्टॉकमध्ये ऍक्शन दिसू शकते. आज कंपनी अंतरिम लाभांशावर बोर्डाची बैठक घेणार आहे.
आनंद राठीचा आयपीओ बंद झाला आहे. शेवटच्या दिवशी हा IPO 9.47 पट सबस्क्राईब होऊन बंद झाला. त्यामुळे या स्टॉकवर गुंतवणूकदारांची नजर राहिल.
RateGain Travel Tech IPO आज खुला होणार आहे. त्याची किंमत 405-425 रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. हा IPO 9 डिसेंबरपर्यंत खुला असेल.
टाटा मोटर्सचा स्टॉक ऍक्शनमध्ये येऊ शकतो. 1 जानेवारीपासून व्यावसायिक वाहनांच्या किमतीत 2.5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे देखील वाचा - Stock to buy today | एक क्लिक, 20 स्टॉक्स आणि लाखोंचा नफा; लावा पैसा
Indo Count & GHCLच्या स्टॉकमध्ये ऍक्शन दिसू शकते. जीएचसीएलचा होम टेक्सटाईल व्यवसाय खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कंपनी जीएचसीएलच्या यूएस उपकंपनीची मालमत्ता संपादन करेल.
Metropolis आणि Dr Lal Path सारखे डायग्नोस्टिक्सवर लक्ष ठेवा. महाराष्ट्र सरकारने RT-PCR च्या किमती कमी केल्या आहेत. आता 500 रुपयांऐवजी 350 रुपये आकारण्यात येणार आहेत.
Rain Ind सारख्या शेअर्समध्ये ऍक्शन दिसून येऊ शकते. Pabrai Investment Fundsने Rain Ind कंपनीचे 68.98 लाख इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत.
LG Balakrishnan & Brothersच्या शेअरमध्ये ऍक्शन दिसू शकते. प्रवर्तकाने 1.65 लाख शेअर्स 492.97 प्रति शेअर दराने विकले आहेत.