Stocks To Buy: सध्या शेअरमार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळते आहे तेव्हा हीच संधी आहे गुंतवणूक करण्याची. सध्या मार्केटमध्ये दमदार शेअर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तुम्ही योग्य अभ्यास करून शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता. किंबहूना यासाठी सध्या ट्रेण्डमध्ये असलेले स्टॉक्सही पाहू शकता. तुमच्या अभ्यासाचे कष्ट आम्ही थोडे कमी करू शकतो, कारण सध्या हा स्टॉक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आपल्या देशातील सर्वात नामवंत विमा कंपनी म्हणजेच एलआयसी (LIC). या स्टॉकनं शुक्रवारी आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीचे (Q2FY23) आपले निकाल सादर केले आहेत. या कंपनीनं सप्टेंबरच्या तिमाहीत त्यांच्या नफ्यात मोठी उडी मारली आहे. (stocks to buys lic share may give investors 45 percent of returns know more)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा


एलआयसीला दुसऱ्या तिमाहीत 15,952 कोटी रुपयांचा नफा झाला. या चांगल्या परिणामांमुळे शेअर मार्केट तज्ञांनी या शेअरमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. एलआयसीनं मागच्या वर्षी 1,434 कोटी रूपयांचा नफा मिळवला होता. त्यातून या कंपनीचे एकूण प्रिमियम उत्पन्न दुसऱ्या तिमाहीतलं  रु. 1,32,631.72 कोटीच्या वर गेले होते. मागच्या वर्षी तेच तिसऱ्या तिमाहीत रु. 1,04,913.92 कोटी होते.


हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल


काय आहे या शेअरमध्ये? 


ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने म्हटले आहे की LIC ही शेअर मार्केटमध्ये आघाडीवर आहे. 2022 पर्यंत एलआयसीचा एकूण APE (वार्षिक प्रीमियम समतुल्य) बाजारातील 44% इतका हिस्सा होता. एलआयसीची टार्गेट प्राईझ 917 रूपये प्रति शेअर एवढी आहे. 11 नोव्हेंबर 2022 रोजी LIC चा शेअर रु.628.05 वर बंद झाला. हा स्टॉक 46 टक्क्यांनी वाढू शकतो. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही. कृपया शेअर मार्केट तज्ञांचा सल्ला घ्यावा.)