सीकर : राजस्थानच्या झुंझुनूं जिल्हातील राजकीय सिनियर शाळेत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना ब्लू व्हेल गेम खेळत असलेल्या चार विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आहे. या शाळेचे प्राचार्य कमलेश कुमार यांनी ब्लू व्हेल गेमचे धोके विद्यार्थ्यांना समजावून सांगितले होते. तरी देखील नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रांना ब्लू व्हेल गेम खेळण्यास शिकवले. याची माहिती प्राचार्यांना मिळली. याबद्दल विद्यार्थ्यांची चौकशी केली असल्यास विद्यार्थ्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांच्या मोबाईलची तपासणी केली असल्यास त्यात ब्लू व्हेल गेम इंस्टाल केलेला होता. त्याचबरोबर दुसऱ्या शाळेतील तीन विद्यार्थी देखील हा गेम खेळत असल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. यापैकी एका विद्यार्थ्याने गेमची चौथी तर इतर तीन विद्यार्थ्यांनी १७ वी, ४० वी आणि ५० वी पायरी गाठली होती. 


नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, मी आता या पायरीवर येऊन गेम सोडू शकत नाही. त्यामुळे माझ्या जवळच्या नातेवाईकांच्या जीवाला धोका आहे. याप्रकरणी मानोसोचारतज्ज्ञ डॉ. कपूर थालौर विद्यार्थ्यांचे कॉउंसलिंग करत आहेत.