नवी दिल्ली : गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये झालेल्या प्रद्युम्न या विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने केंद्र सरकार, हरियाणा सरकार आणि एचआरडी मिनिस्ट्रीला नोटीस पाठवून तीन आठवड्यात या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्याचे वडील वरुण कुमार यांनी कोर्टात मागणी केली आहे की या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. वरुण कुमार यांच्या वकिलाने सांगितलं की, आम्ही कोर्टात मागणी केली की, शाळेमध्ये कसली कमतरता होती आणि शाळेची जबाबदारी काय होती हे ठरवलं जावं आणि याबाबत आयोग किंवा ट्रिब्यूनल बनवावं. कोर्टाने रायन शाळेला देखील नोटीस पाठवली आहे.


रायन ग्रुपचे सीईओ रेयान पिंटो यांनी बॉम्बे हायकोर्टमध्ये एंटीसिपेटरी बेल अटतपूर्व जामीनसाठी अर्ज केला आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे.