Tailor Master Video: आज मार्केटमध्ये एकशेएक रेडीमेड कपडे (Ready-made clothes) मिळतात. अगदी कुठल्याही साडीवर चांगले डिझायनर (designer) रेडीमेड ब्लाऊजही (Blouse) बाजारात सहज उपलब्ध आहेत. पण आजही काही तरुणी (young woman) आणि महिला (woman) आहेत ज्यांना शिवलेले कपडे घ्यालायला आवडतात. मग त्यासाठी आपल्याला ट्रेलर मास्टरकडे जावं लागतं. आपल्या आजूबाजूला आज अनेक महिला आणि पुरुष ट्रेलर मास्टर (tailor Master) आहेत. ट्रेलर मास्टर आणि ग्राहकांचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. सोशल मीडियावर (Social media) असाच एक ट्रेलर मास्टर ( Fitting Master) आणि तरुणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 


धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ (Video) पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता एक तरुणी कपडे शिवण्यासाठी ट्रेलर मास्टरकडे जाते. कपडे शिवण्यासाठी तरुणीला अंगाचं मापं द्यावं लागणार होतं. अशात तो ट्रेलर तिचं मापं घेण्यासाठी हात पुढे करतो आणि तिच्या शरीराला नको त्या ठिकाणी स्पर्श करतो. ट्रेलर मास्टरचं हे घृणास्पद कृत्य पाहून तरुणीला धक्का बसतो. हा ट्रेलर दुकानात येणाऱ्या महिलांसोबत मापं घेण्याच्या बहाण्यानं अश्लील चाळे करायचा. (Tailor Master harassment woman Shocking Video nmp)


महिला पोलिसाने घडवली अद्दल


ही तरुणी शांत बसत नाही, ती पोलिसांकडे या ट्रेलर मास्टरची तक्रार करते. यानंतर एक महिला पोलीस (Police) बुरखा घालून या ट्रेलर मास्टरकडे येते आणि आपल्याला कपडे शिवायचे आहेत असं सांगते. त्यावेळी ट्रेलर मास्टर या महिलेसोबतही हेच करतो आणि तो रंगेहात पोलिसांच्या तावडीत सापडतो. 


ट्रेलर मास्टरचं घृणास्पद कृत्य (horrible act) सीसीटीव्हीत (cctv) कैद झालं आहे. त्यामुळे जर कोणासोबत असं काही होत असेल तर शांत न राहता, पोलिसांकडे तक्रार करा आणि वेळीच अशा नराधमांना अद्दल घडवा. महिलांना जनजागृतीसाठी हा व्हिडीओ Social Awareness Video या नावाने टाकण्यात आला आहे. 


पाहा धक्कादायक व्हिडीओ