बंगळुरू: ताजमहाल हा मुघलसम्राट शहाजानने नव्हे तर मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधला होता, असा आश्चर्यकारक दावा केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केला. ते रविवारी कर्नाटकच्या कोडगु जिल्ह्यातील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, ताजमहाल हा मुसलमानांनी बांधला नव्हता. खुद्द शहाजानने आपल्या आत्मचरित्रात ताजमहाल राजा जयसिंग यांनी बांधल्याचे स्पष्ट केले आहे. ताजमहाल हे मुळात एक शिवमंदिर आहे, असे हेगडे यांनी म्हटले. इतकेच नव्हे हिंदू समाज असाच झोपून राहिला तर एक दिवस तुमच्या घरांवर 'मकान' ऐवजी 'मंजिल' अशा पाट्या लागतील. एवढेच नव्हे तर भविष्यात श्रीरामाला 'जहांपनाह' आणि सीतेला 'बीबी', अशी हाक मारावी लागेल, असेही हेगडे यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेगडे यांचे हे संपूर्ण भाषणच वादग्रस्त ठरले आहे. जातीसंदर्भात विचार न करता आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे. आपल्याला समाजाची प्राथमिकता ठरवायला हवी. हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात छाटायला पाहिजेत. इतिहास असाच लिहला जातो. तुम्ही ज्यावेळी इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात हिंमत येते. इतिहास लिहायचा की वाचायचा हे तुम्हीच ठरवा, असे हेगडे यांनी सांगितले. 


ताजमहाल मकबरा की शिवमंदीर? CIC नं सरकारला विचारला प्रश्न


वादग्रस्त विधान करण्याची ही हेगडे यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी देशाच्या संविधानातून सेक्युलर हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यांच्या या विधानानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. यानंतर हेगडे सातत्याने काही ना काही वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिले होते. 


काँग्रेसचा 'तो' नेता मुस्लीम पत्नीच्या इशाऱ्यावर नाचतो; अनंतकुमार हेगडेंची जीभ पुन्हा घसरली