तिरुपतीला जाऊन लोक मुंडण का करतात? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर

दरवर्षी हजारो भाविक तिरुपती बालाजी यांच्या दर्शनासाठी तिरुमला येथे येतात. दर्शनासाठी आलेलं अनेक भाविक येथे येऊन मुंडण करून आपले केस अर्पण करतात. मात्र अनेक भाविकांना यामागचं नेमकं कारण काय याविषयी कल्पना नसते. तेव्हा तिरुपती बालाजीला जाऊन केस अर्पण करण्यामागची नेमकी आख्यायिका काय आहे याबाबत जाणून घेऊयात. 

| Sep 20, 2024, 15:33 PM IST
1/8

तिरुपती बालाजी येथे जाऊन केवळ पुरुषचं नाही तर महिला सुद्धा मुंडण करून केस अर्पण करतात. बालाजी येथे केस अर्पण करण्याच्या प्रथेला 'कल्याण कटा' असे म्हंटले जाते.   

2/8

अनेकजण येथे येऊन नवस पूर्ण झाल्यावर तो फेडण्यासाठी केस अर्पण करतात. तर काही भाविक तिरुपती बालाजीच्या चरणी इर्षा अहंकाराचा त्याग म्हणूनही केस अर्पण करतात. 

3/8

हिंदू धर्मात केस अर्पण करण्याच्या पद्धतीला खूप महत्व दिले जाते. बाळाचं बारस केल्यावर त्याचे केस काढून देवाला अर्पण केले जातात तर नागा साधू बनण्यासाठी सुद्धा केस अर्पण केले जातात.   

4/8

कोरा या साईटवर एका यूजरने लिहिल्या नुसार तिरुपती बालाजी येथे जाऊन केस अर्पण करण्यामागे एक प्राचीन कथा सुद्धा आहे. ज्यानुसार एकदा बालाजी देवतेच्या ठिकाणी मुंग्याचा पर्वत बनला होता. तेथे एक गोमाता येऊन दूध देत असे. बऱ्याचदा असे घडले. एके दिवशी गायीच्या मालकाने ते पाहिले आणि तो खूप क्रोधीत झाला. त्याने जवळच पडलेली एक कुऱ्हाड घेतली आणि गायीवर उगारली. त्यावेळी बालाजी देवतेवर तो घाव लागला आणि त्यांचे काही केसही तुटले. 

5/8

या घटनेनंतर नीला देवीने तातडीने येऊन आपले काही केस कापले आणि बालाजी देवतेला जिथे घाव झाला होता तिथे ठेवले. नीला देवीने तसे करताच तिरुपती बालाजी देवाचा घाव भरला. या कृतीने नारायण प्रसन्न झाले आणि म्हणाले की, केस हा शारिरीक सुंदरतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. असे असूनही त्याचा त्याग करून घाव भरलास. तेव्हा जो व्यक्ती अशा प्रकारे केसांचा त्याग करून मला अर्पण करेल, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असे वरदान तिरुपती बालाजी देवाने दिले. 

6/8

तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट वर्षातून 4 ते 5 वेळा आपल्याकडे आलेल्या केसांचा लिलाव करतं. यात दानात मिळालेल्या केस अनेक ग्रेड्समध्ये विभागले जातात. कलर किंवा डाय केलेले केस, पांढरे केस, काळे केस इं. वेगळे केले जातात. मग त्यांचा लिलाव करण्यात येतो. 

7/8

केसांचा लिलाव ग्रेडच्या आधारे केला जातो. 2023 मध्ये 4 वेळा केसांचा लिलाव करुन तिरुपती मंदीर ट्रस्टला 150 कोटी कमाई झाल्याची माहिती समोर येत आहे. तिरुपति मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे येते केस दान देखील वाढले आहे. यामुळे मंदिराची कमाईदेखील वाढली आहे.

8/8

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे.संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)