Crime News : तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) एका मित्राकडून दुसऱ्या मित्राची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवाळीनिमित्त पार्टीसाठी गेलेले असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर मृताच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह कोणालाही कल्पना न देता पुरला आहे. पोलिसांना (Tamil Nadu Police) या प्रकरणाची माहिती कळताच त्यांनी मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात हरणांच्या शिकारीवर बंदी आहे. पण बंदी झुगारुन अनेकदा शिकार करतात. अशाच हरणाच्या शिकाराच्या प्रयत्नात तामिळनाडूमध्ये मित्राच्या हातून एका मित्राला जीव गमवावा लागला. तमिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यात, शक्तीवेल, प्रकाश आणि शक्तीवासन हे तीन मित्र दिवाळीच्या पार्टीसाठी हरणांची शिकार करण्यासाठी जंगलात गेले होते. दिवाळीच्या पार्टीसाठी हरणाचे मांस खाण्याची तिघांची योजना होती. त्यानुसार जंगलात हरणाला पाहताच शक्तीवासनने बंदुकीचा ट्रिगर दाबला. पण त्याचा नेम चुकला आणि गोळी हरणाऐवजी त्याचा मित्र शक्तीवेलला लागली. यात शक्तीवेल याचा जागीच मृत्यू झाला तर प्रकाश यांच्या चेहऱ्यावर मोठी जखम झाली.


मिळालेल्या माहितीनुसार, तीन मित्रांचा हा ग्रुप एका हरणाची शिकार करण्यासाठी गेला होता. यावेळी हरणाला लक्ष्य करत असताना अचानक गोळी सुटून शक्तीवेलला लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत प्रकाश याच्या चेहऱ्यावर गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.


मृतदेहावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न


तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई जंगलातून अनेकदा हत्तींच्या हिंसाचाराच्या बातम्या समोर येत असतात. या सगळ्या प्रकारानंतर शक्तीवेलच्या कुटुंबीयांनी पोलीस किंवा वनविभागाला न कळवताच त्याचा मृतदेह पुरण्याचा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमुनामरातूर पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.  याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे. यासोबत शस्त्राची तपासणी करण्यात येत आहे.