Body Builder Death : 21 वर्षांच्या एका बॉलिबिल्डरच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बॉडी बिल्डरचा मृत्यू ब्रेड घशात अडकल्याने झाला. वर्कआऊट (WorkOut) केल्याननंतर त्या तरुणाने नाष्टा केला. नाष्ट्यात त्याने ब्रेड (
Bread) खाल्ला. पण ब्रेडचा तुकडा त्याच्या गळ्यात अडकला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या बॉडीबिल्डरचं (Body Builder) नाव एम हरिहरण असून असून तो तामिळनाडूतल्या (Tamilnadu) सलेम जिल्ह्यात राहात होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरिहरण स्टेट लेव्हल बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये (State Level Body Building Championship) भाग घेणार होता. यासाठी त्याची जोरदार तयारी सुरु होती. 70 किलो वजनी गटात त्याने भाग घेतला होता. तामिळनाडुमधल्या कुड्डालोर जिल्ह्यात ही चॅम्पियनशीप होणार होती. हरिहरण जीममध्ये काही तास व्यायामाबरोबर योग्य आहारावरही लक्ष देत होता. 


स्पर्धेत भाग घेण्यासाठी राज्यातील विविध भागातून स्पर्धक आले होते. स्पर्धेच्या आदल्या दिवशी हरिहरण जीममध्ये वर्कआऊट करत होता. रात्री आठच्या दरम्यान वर्कआऊटमधून त्याने ब्रेक घेतला. ब्रेक दरम्यान त्याने नाष्टा मागवला. नाष्ट्यात आलेला ब्रेड हरिहरणने खाल्ला. पण ब्रेडचा एक तुकडा हरिहरणच्या घशात अडकला. त्यानंतर श्वासोश्वास करण्यास त्रास होऊ लागला आणि काही वेळातच तो बेशुद्ध झाला. हरिहरणला तात्काळ सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हरिहरणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


जीममध्ये व्यायाम करताना पोलिसाचा मृत्यू
याआधी काही दिवसांपूर्वीच हैदराबादेत जीममध्ये व्यायाम करताना एका पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. विशाल असं या तरुणाचं नाव असून तो अवघ्या 24 वर्षांचा होता. विशाल हैदराबादमधल्या असिफ नगर पोलीस स्थानकात कार्यरत होता. त्याला व्यायामाची प्रंचड आवड होती. 23 फेब्रुवारीला तो नेहमीप्रमाणे ड्युटीवर आल्यानंतर जीममध्ये गेला. पण व्यायाम करत असतानाच त्याला हार्टअटॅकचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येची घटना जीममधल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 


हे ही वाचा : धोणी, माधुरी दीक्षित, अभिषेक बच्चनच्या नावाने लाखो रुपयांची खरेदी, लुटीची हैराण करणारी मोडस ओपरेंडी


व्यायाम करत असताना विशालच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यामुळे त्याने तिथल्या एका मशिनचा आधार घेतला. पण काही क्षणातच तो जमिनीवर कोसळला. जीममध्ये व्यायाम करणारे इतर तरुण मदतीसाठी धावले आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच विशालचा मृत्यू झाला होता.