Tata Motors च्या शेअरमध्ये मोठी वाढ, गुंतवणूकदारांची चांदी; वाचा नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price: . सोमवारी सकाळच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये (Tata Motors share) आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर (BSE)शेअर 8.12 टक्क्यांनी वाढून 473.10 रुपयांवर पोहोचला, तर एनएससीवर (NSE) शेअर 8.14 टक्क्यांनी वाढून 473.30 रुपये प्रति शेअर (Tata Motors Share Price) झाला.
Tata Motors share : गेल्या दोन महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये (Share Market) चढउतार पहायला मिळत आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने अनेक शेअर्समध्ये मोठी घसरण होत असल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता एका शेअर्समुळे गुंतवणूकदारांची (Investors) चांदी झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेक गुंतवणूकदारांचा लाडका शेअर अशी या शेअरची ओळख आहे. होय, टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये (Tata Motors) मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी टाटा मोटर्सच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. सोमवारी सकाळच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये (Tata Motors share) आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर (BSE)शेअर 8.12 टक्क्यांनी वाढून 473.10 रुपयांवर पोहोचला, तर एनएससीवर (NSE) शेअर 8.14 टक्क्यांनी वाढून 473.30 रुपये प्रति शेअर (Tata Motors Share Price) झाला. मात्र, अचानक टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये वाढ कशी काय झाली? असा सवाल अनेकांना पटला असेल.
नेमकं कारण काय?
टाटा मोटर्सने एका निवेदनात जारी केलं. त्यात त्यांनी म्हटलंय की, टाटा मोटर्स आणि Tata Daewoo श्रेणीच्या सर्व व्यावसायिक वाहनांची जागतिक घाऊक विक्री या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत 1,18,321 युनिट्स इतकी झालीये, जी विक्री मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 3 टक्क्यांनी अधिक आहे. गुंतवणूकदारांना ही माहिती मिळताच शेअर्समध्ये (Tata Motors Share Price) मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं.
आणखी वाचा - Stock Market: 'या' दमदार स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक... मिळेल छप्परफाड रिटर्न्स
दरम्यान, मागील वित्त वर्षात Jaguar Land Rover च्या मागणीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलंय. मागील वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत टाटा मोटर्सने JLR ची विक्री एकूण 3,61,361 युनिट्सची विक्री केली. ज्यामध्ये Jaguar च्या 15,499 युनिट्स आणि लँड रोव्हरच्या 91,887 युनिट्सचा समावेश आहे. त्यामुळे यंदा धंदा अधिक वाढल्याने गुंतवणूकदारांचा शेअर्सवरील विश्वास अधिकच वाढल्याचं चित्र आहे.