नवी दिल्ली : बऱ्याचदा काळ आलेला असतो पण वेळ येत नाही किंवा नशीब साथ देतं म्हणून अपघातातून वाचल्याचे किस्से ऐकले असतील. पण चक्क एका व्यक्तीला कारनं अपघातातून वाचवलं आहे. हे वाचून एक क्षण तुमचाही विश्वास बसणार नाही. पण कार अपघातात गाडीचं नुकसान झालं पण व्यक्तीला खरचटलंही नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही वर्षांत, टाटा मोटर्सने भारतीय ग्राहकांसाठी आपल्या कारमध्ये विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली आहे. हेच कारण आहे की ग्लोबल NCAP मधील जवळपास सर्व नवीन टाटा गाड्यांना सुरक्षिततेसाठी 5- स्टार रेटिंग मिळू लागली आहे. 


गेल्या काही वर्षात टाटाने ग्राहकांचा विचार करून गाड्या अधिक मजबूत आणि सुरक्षित तयार केल्या आहेत. किंमतीनुसार सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जात नाही.  रस्त्यावर टाटा नेक्सॉनच्या सुरक्षिततेची चाचणी घेण्यात आली आहे.


हिमाचल प्रदेशमध्ये टाटा नेक्साचा अपघात झाला. कार बर्फावरून घसरल्याने 200 फूट दरीत कोसळली. 200 फूट तळापर्यंत जात असताना ही कार 5 वेळा गोलांट्या उड्या घेऊन कोसळली.  या अपघाताचा व्हिडीओ युट्यूबर निखिल राणा याने शेअर केल्याने ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. 


निखिल आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी हा संपूर्ण प्रकार सांगितला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी कारमध्ये दोघेजण होते. या अपघातात गाडीचं नुकसान झालं पण दोघांनाही खरचटलंही नाही. सुखरुप बचावले आहेत. 


क्रेनच्या सहाय्याने ही कार खेचून रस्त्यावर आणण्यात आली. या अपघातात कारलाही फारसे नुकसान झाले नाही. Tata Nexon ही भारतातील पहिली कार आहे जिला ग्लोबल NCAP ने 5-स्टार सेफ्टी रेटिंग दिलेली आहे. सुरक्षिततेसाठी कारने 17 पैकी एकूण 16.7 गुण मिळवले आहेत.


सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात सुरक्षित अशी ही मेड इन इंडिया कार आहे.  SUV सोबत फुल-चॅनल एबीएस, 2 एअरबॅग्स, सीटबेल्ट रिमाइंडरसारखे सेफ्टी फीचर्स असं खास वैशिष्ट्य आहे.