TCS Recruitment: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसमध्ये काम करावे अशी अनेकांची इच्छा असते. या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण टाटा कम्युनिकेशन सेंटरने यंदा बंपर नोकरभरतीची घोषणा केली आहे. टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्स नियुक्त करण्याची तयारी करत असल्याची माहिती  TCS सीओओ, एन गणपति सुब्रमण्यम यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयटी क्षेत्रातील इतर आघाडीच्या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या बाबतीत काळजी घेत आहेत. तर दुसरीकडे टीसीएसद्वारे दरवर्षी सुमारे 35 हजार ते  40 हजार नवीन कर्मचारी नियुक्त केले जातात.  टीसीएसमध्ये सतत नवीन नियुक्त्या सुरु आहेत.  असे असताना कंपनी कोणत्याही प्रकारची कर्मचारी कपात करणार नाही, असेही टीसीएसचे सीओओ सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले आहे. 


इन्फोसिसने या वर्षी कॅम्पस प्लेसमेंट आयोजित करणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.  गेल्या वर्षी कंपनीने 50 हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली होती. जोपर्यंत मागणीत वाढ होत नाही तोपर्यंत कॅम्पस हायरिंग करणार नसल्याचे इन्फोसिसचे सीएफओ निलांजन रॉय यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितले होते. 


स्टाफ सिलेक्शनअंतर्गत बंपर भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी


सध्या कॅम्पस हायरिंग नाही


सुब्रमण्यम यांनी लॅटरल एन्ट्रीद्वारे नोकऱ्या देण्याची शक्यता नाकारली नाही. इन्फोसिसची नियुक्ती धोरण मागणीशी निगडीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागच्या वर्षी 50 हजाक तरुणांना मागणीच्या अगोदर कामावर घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही कर्मचाऱ्यांना AI इत्यादी मध्ये प्रशिक्षण देत आहोत. सध्या आम्ही कॅम्पसमध्ये जात नाही आहोत. आम्ही आमच्या भविष्यातील अंदाज लक्षात घेऊन प्रत्येक तिमाहीत याकडे लक्ष देऊ. प्रोजेक्ट आल्यावर भरती केली जाईल, असे सुब्रमण्यम यांनी स्पष्टपणे सांगितले.


MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती, सरकारी नोकरी आणि 1 लाखांवर पगार


गेल्या 12 ते 14 महिन्यांत मोठी घसरण


जेव्हा खर्चात कपात करण्याचा दबाव असतो तेव्हा लॅटरल एंट्रीद्वारे कमी संख्येने कर्मचारी नियुक्त केले जातात. गेल्या 12 ते 14 महिन्यांत मोठी घसरण झाली आहे. हे किती काळ चालू राहील माहीत नाही, असे सुब्रमण्यम म्हणाले. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त लोकांना आम्ही कामावर घेतले. TCS चा वापर दर सध्या सुमारे 85 टक्के आहे, जो पूर्वी 87-90 टक्के इतका होता, असेही यावेळी सांगण्यात आले.