चंद्रबाबू नायडूंचा `टीडीपी` एनडीएतून बाहेर, दोन मंत्र्यांना राजीनामा द्यायचे आदेश
टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरावती : टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातील त्यांच्या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यायचे आदेश दिले आहेत. अशोक गजपती राजू आणि वाय.एस.चौधरी हे दोन खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत.
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून चंद्रबाबू नायडू यांनी केली होती. पण ही मागणी मान्य न झाल्यामुळे टीडीपीनं हा निर्णय घेतला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात येणार नाही तर आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज देऊ, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली होती.