मुंबई : टीम इंडियाने न्यूझीलंडचा टी२० सीरीजमध्ये (India vs New Zealand) पराभव करत इतिहास रचला आहे. ही सीरीज टीम इंडियाने ५-० ने जिंकली असून अनेक रेकॉर्ड टीमने आपल्या नावे केले आहेत. यापैकी सर्वात खास म्हणजे क्लीन स्वीपचा रेकॉर्ड.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडमध्ये पहिला विजय


या सीरीजमध्ये टीम इंडियाने लागोपाठ टी२० सामने जिंकण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. कोणत्याही देशात जावून भारतीय टीमने असा पहिला विजय साकारला आहे. टीम इंडिया पाचही सामने जिंकत नवे रेकॉर्ड बनवले. न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा भारताने सीरीज जिंकली. 


पहिल्यांदा दोन सुपर ओव्हर
 
पहिल्यांदा लागोपाठ २ सामन्यांमध्ये सुपर ओव्हर झाले आहेत. टीम इंडियाने या दोन्ही सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच झालं. दोन्ही वेळा टीम इंडियाने मॅच टाय करत सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.


विराटचा रेकॉर्ड 


टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नेतृत्व करताने सर्वाधिक टी२० सीरीज जिंकण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. विराटची ही दहावी टी२० सीरीज होती. त्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसला मागे टाकलं आहे.


विराटचं परदेशात क्लीन स्वीप


विराट कोहलीसाठी ही तिसरी सीरीज आहे. ज्यामध्ये त्याने क्लीन स्वीप दिला आहे. २०१९ मध्ये वेस्टइंडीजला वेस्टइंडीज/अमेरिकेमध्ये आणि २०१६ ला ऑस्ट्रेलियाचा ३-० ने पराभव केला होता.


पहिल्या सामन्यात हा खास रेकॉर्ड


पहिल्या टी२० सामन्यामध्ये २०४ रनचं टार्गेट गाठत टीम इंडियाने नवा रेकॉर्ड बनवला आहे. टी-२० मध्ये २०० हून अधिक रनचं टार्गेट परदेशात जावून पूर्ण करण्य़ाचा रेकॉर्ड टीम इंडियाने केला आहे. याआधी भारताने इंग्लंडमध्ये १९९ रनचं टार्गेट गाठलं होतं.