नवी दिल्ली : शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. तांत्रिक शिक्षण 'करस्पाँडन्स' करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा निर्वाळा देतानाच इंजिनिअरिंगसारखे कोर्समधून 'डिस्टन्स लर्निंग'च्या नावाखाली चालवत पैसे गोळा करणाऱ्या शिक्षण संस्थांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलंय. 


सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय देताना पंजाब - हरियाणा हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं... तर ओडिसा हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाला रद्द केलं. 


दोन वर्षांपूर्वी पंजाब-हरियाणा हायकोर्टानं कम्प्युटर सायन्सच्या एका डिग्रीला रेग्युलर डिग्री मानण्यास नकार दिला होता... तर ओडिसा हायकोर्टानं करस्पाँडन्ट कोर्सनं तांत्रिक शिक्षण योग्य ठरवलं होतं... 


तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे.