World's Top Currency 2022: जगातील प्रत्येक देशाचं स्वत:चं चलन असतं. त्या चलनाच्या माध्यमातून देशात आणि जागतिक बाजारपेठेत व्यवहार चालतो. त्यामुळे प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था अधोरेखित होतं असते. जगातील काही देशांचं चलनं इतकं महागडं आहे की, त्याबद्दल वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या चलनांचे मूल्य उर्वरित जगाच्या चलनांपेक्षा जास्त आहे. भारताच्या रुपयाचं मूल्य या चलनाच्या तुलनेत खूपच कमी आहे. चला तर मग जाणून घेऊयात भारतीय रुपया या चलनाच्या तुलनेत कुठे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुवैती दिनार: clacified.com नुसार, कुवैती दिनार हे जगातील सर्वात महागडं चलन आहे. याचा चलन कोड KWD आहे. सध्या एका कुवैती दिनारचे मूल्य 3.26 अमेरिकन डॉलर आहे. भारतीय चलनाची तुलना केली, तर एका कुवैती दिनारचे मूल्य 259.52 रुपये आहे. 


बहरीन दिनार: दुसऱ्या क्रमांकावर बहरीन दिनारचा क्रमांक येतो. एक बहरीन दिनारचं मूल्य 2.65 अमेरिकन डॉलर इतकं आहे. भारतीय रुपयाचा विचार केला, तर त्याची किंमत 211.7 रुपये इतकी आहे. 


ओमान रियाल: ओमान रियाल ही जगातील तिसरी महागडी करन्सी आहे. या करन्सीचा कोड OMR आहे. ओमान रियालचं मूल्य 2.60 अमेरिकन डॉलर्स इतकं आहे. त्याची एका ओमान रियालसाठी भारतीयांना 206.96 रुपये मोजावे लागतील. 


जॉर्डन दिनार: जॉर्डन दिनार जगातील चौथं महागडं चलन आहे. एक जॉर्डन दिनारची किंमत 1.41 अमेरिकन डॉलर आहे. भारतीय चलनाचं मूल्य एक जॉर्डन दिनारसाठी 112.24 रुपये इतकी आहे.


ब्रिटीश पाउंड स्टर्लिंग: ब्रिटीश पाउंड स्टर्लिंग जगातील पातवी महागडी करन्सी आहे. या करन्सीचा कोड GBP असून एका ब्रिटिश पाउंड स्टर्लिंगची किंमत 1.21 अमेरिकन डॉलर्सच्या बरोबरीत आहे. भारतीय रुपयाची किंमत पाहिली 96.30 रुपये इतकी आहे.