उज्जैनच्या तांत्रिकाची भविष्यवाणी सांगते हेच बनणार सरकार
कोण जिंकणार, कोण हरणार, कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
उज्जैन : उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षात ओउटगोईंग, इनकमिंग सुरु आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. यातच उज्जैन येथील एका मोठ्या तांत्रिकाने मोठी भविष्यवाणी केली आहे.
हे तांत्रिक अनेक वर्षांपासून उज्जैन येथील स्मशानभूमीत तांत्रिक क्रिया करत आहे. परिसरात त्यांची ओळख आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत असतात. हे तांत्रिक बाबा नियमितपणे भगवान महाकालच्या भस्म आरतीला उपस्थित राहतात.
उज्जैन येथील या तांत्रिकाचे नाव आहे बम बमनाथ अघोरी बाबा. सिंहस्थ 2016 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतर आजतागायत ते सीएम योगींना भेटलेले नाहीत. पण, गुरुभाई आणि एकाच पंथाचे असल्याने ते योगी यांच्यासाठी सतत तंत्रपूजा करत असतात.
याच अघोरी बाबांनी यूपी विधानसभा निवडणुकीबाबत भाकीत वर्तविले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवेल असा दावा त्यांनी केला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला यूपीची जनता आणखी एक संधी देईल असे त्यांनी म्हटले आहे.