Rameswaram Bath With Chili Powder: तामिळनाडूमधील रामेश्वरमध्ये आदि अमवस्येच्या दिवशी पवित्र पूजा केली जाते. या पूजेला पिदुरकर्म पूजा असं म्हणतात. ही पूजा पितृ दोष मुक्तीसाठी केली जाते असं स्थानिक मानतात. रामेश्वरम मंदिराच्या परिसरामध्ये ही पूजा आणि अनुष्ठान करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं दरवर्षी भक्त येतात. बुधवारी अग्नि तीर्थम समुद्रामध्ये दिवंगत पूर्वजांच्या शांतीसाठी श्रद्धाळुंनी नैवैद्य अर्पण केला. या पूजेमधील खास आकर्षण म्हणजे पुजारी चक्क मिरची पूड वापरुन अंघोळ करतात. ही प्रथाही पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केली जाते असं म्हणतात.


चंद्रावर आधारित कालगणना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तामिळनाडूमधील धर्मपुरी जिल्ह्यामधील एका पुजाऱ्याने, 'भक्तांना दुर्भाग्यपासून वाचवण्यासाठी' 108 किलो मिरची पूड मिसळेल्या पाण्याने अंघोळ केल्याचं दिसत आहे. अनुष्ठानाचा हा व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने शेअर केला आहे. आदि अमवस्येचा दिवस हा हिंदूंमध्ये चंद्राच्या कलांवरआधारित कालगणनेनुसार फार महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी विशेष पूजेबरोबरच उपवासाच्या माध्यमातून पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते. विशेष म्हणजे अनेकजण आमवस्येच्या दिवशी उपवास ठेवतात.


108 किलो मिरची पूड आणि पाण्याने स्थान


भक्त आपल्या दिवसाची सुरुवात अग्नि तीर्थम समुद्रामध्ये स्थान करुन करतात. संगलपम, दर्पणम, पिंडम, गोथानम, वस्त्राथनम आणि भोजन दानसारखे अनुष्ठान म्हणजे पिदुरकर्म पूजेचाच भाग असतात. अनेक बादल्यांमध्ये मिरची पूड टाकून ती योग्य पद्धतीने एकत्रित केली जाते. 108 किलो मिरची पूड आणि पाण्याचं घट्ट मिश्रण अंगावर ओतून घेत इतरांच्या मदतीने मुख्य पुजारी स्थान करतात. यावेळेस सर्व भक्त समोर उभे राहून हे स्थान पाहत असतात.



मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था


दरवर्षी या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेत विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. तसेच ऑल इंडिया पेलिग्राम गाइड्स असोसिएशनने अनुष्ठान स्थान वेगाने व्हावे, सर्वांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी स्वयंसेवकांची संपूर्ण फळीच उभारण्यात आली होती. हे स्वयंसेवक सर्वांनाच मदत करत होते. अगदी स्नानासाठी मदत करण्यापासून ते योग्य नियोजनासाठीही या स्वयंसेवकांनी मदत केली. स्थानिक पोलिसांच्या तुकड्याही या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस आणि स्वयंसेवकांबरोबरच वेगवगेळ्या संस्थांनाही सहकार्य केलं.