Today Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. अशातच आज (10 December) शनिवारलाही सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,750 तर 24 कॅरेट साठी 54,280 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 676 रुपये आहे. (today gold silver price update 10 December 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.


चेन्नई - 55,060 रुपये


दिल्ली - 54,440 रुपये


हैदराबाद - 54,280 रुपये


कोलकत्ता - 54,280 रुपये


लखनऊ -54,440 रुपये


मुंबई - 54,280 रुपये


नागपूर - 54,280 रुपये


पुणे - 54,280 रुपये


22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?


24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे.  22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.


सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?


सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.