भयंकर! कुठं पोहोचलंय `हामून` चक्रीवादळ? `या` भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
Weather Update : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतातील वातावरण बहुतांश प्रमाणात बदलताना दिसत असून, मान्सूननंतरच्या या काळात पावसाचीही हजेरी काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे.
Weather Update : महाराष्ट्रातून पावसानं (Maharashtra weather) काढता पाय घेतला असला तरीही राज्यात अद्यापही थंडीची चाहूलही लागलेली नाही. उलटपक्षी किनारपट्टीलगत असणाऱ्या अनेक भागांमध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळं उन्हाचा तडाखा आणखी जाणवू लागला आहे. त्यातच आता देशावर घोंगावणायर्या हामून या चक्रीवादळामुळं परिस्थिती आणखी बिघडताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार 'हामून' संदर्भातील नवी माहिती समोर आली असून, पुढील 12 तासांमध्ये या वादळाच्या परिणामस्वरुप नागालँड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार नागरिकांनाही या वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक राज्य शासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं कळत आहे.
हेसुद्धा वाचा : मनस्ताप! शुक्रवारपासून पुढील 11 दिवस लोकल प्रवासाच्या वेळापत्रकात उलथापालथ; काय आहे यामागचं कारण?
खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या वृत्तानुसार सध्या हामून हे चक्रीवादळ उत्तर पूर्वेच्या दिशेनं पुढे सरकत असून, त्यानं 25 ऑक्टोबरला बांगलादेशचा किनारा ओलांडला होता. या वादळादरम्यान वाऱ्यांचा वेगही जास्त असून हा वेग 75 ते 85 किमी प्रतितास इतका असून, पुढं हे वादळ तीव्र होऊन लगेचच त्याची तीव्रता कमी होताना दिसणार आहे अशी शक्यता वर्तवली जातेय. गुरुवारी सायंकाळपर्यंत हे वादळ कुमकुवत होणार आहे. फक्त हामूनच नव्हे तर, असेच वादळसदृश वारे आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरता तयास होताना दिसत आहेत. समुद्रसपाटीपासून 1.5 ते 3.1 किमीच्या उंचीवर या वाऱ्यांची निर्मिती होत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
देशातील हवामानाचा आढावा....
हवमान विभागानुसार मागील 24 तासांमध्ये मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आसाम, मेघाल. आणि नागालँडमध्ये हलक्या स्वरुपातील पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तर, तिथं केरळातही मध्यम स्वरुपातील पावसानं वातावरणात गारवा आणला. येत्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, पूर्व भारतासह इतर काही भागांमध्ये तापमानात घट नोंदवली जाणार आहे. ज्यामुळं रात्रीच्या वेळी हिवाळ्याची चाहूल जाणवेल. तिथं देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या काश्मीरच्या खोऱ्यात बर्फवृष्टी होणार आहे. तर, पंजाबपासून हिमाचलपर्यंतचं तापमान मोठ्या फरकानं कमी होणार आहे.