Tractor Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा वाहनांच्या अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. या व्हिडीओवर तुफान प्रतिक्रिया येतात. मात्र नुकत्याच व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेमकं काय बोलावं हेच अनेकांना समजत नाहीय. व्हिडीओमध्ये ट्रॅक्टर आपोआप सुरु होतो. विशेष म्हणजे या ट्रॅक्टरमध्ये कोणी बसलेलंही नव्हतं. अचानक हा ट्रॅक्टर सुरु होता आणि समोर दिसेल ती गोष्ट उडवत निघतो. अनेक गोष्टींची तोडफोड केल्यानंतर एक व्यक्ती या ट्रॅक्टरचं इंजिन बंद करते आणि हा ट्रॅक्टर थांबतो. वेळीच या ट्रॅक्टरवर नियंत्रण मिळवलं नसतं तर नक्कीच अधिक नुकसान झालं असतं असं व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून दिसून येत आहे. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात..


कुठे घडला हा प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यामध्ये घडला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती काही कामानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. यावेळेच या व्यक्तीने एका शोरुमसमोर आपला ट्रॅक्टर उबा केला. सीसीटीव्हीमधील व्हिडीओनुसार हा ट्रॅक्टर उभा असताना अचानक तो स्टार्ट होतो. हा ट्रॅक्टर आपोआप सुरु होतो आणि पुढे चालू लागतो. ट्रॅक्टर या शोरुमच्या मुख्य दरवाजाला धडक देतो. ट्रॅक्टरची धडक बसताच हा काचेचा दरवाजा तुटतो. विशेष म्हणजे यानंतरही हा ट्रॅक्टर थांबत नाही.


ट्रॅक्टर बंद करता करता फुटला घाम


ट्रॅक्टर आपोआप सुरु झाला आहे आणि तो शोरुमच्या मुख्य द्वाराकडे चालत येत असल्याचं पाहून या शोरुमच्या रिसेप्शन काऊंटवर बसलेला मुलगा घाबरुन इकडे तिकडे पळून लागतो. या मुलाला काय करावं हे समजत नसतानाच ट्रॅक्टर शो रुमची काच तोडून आतमध्ये शिरतो. त्यानंतर समोर उभ्या असलेल्या बाईक आणि सायकलला हा ट्रॅक्टर चिरडतो. त्याच वेळेस शोरुममधील एख व्यक्ती ट्रॅक्टर जवळ जातो आणि चावीने ट्रॅक्टर बंद करायचा प्रयत्न करतो. मात्र त्यात त्याला यश येत नाही. तेव्हा ही व्यक्ती ब्रॅक दाबून ठेवते. अन्य एक व्यक्ती ट्रॅक्टरचं इंजिन बंद करण्याचा प्रयत्न करतो. अखेर या दोघांना यश येतं आणि ट्रॅक्टर या दोघांना थांबवण्यात यश मिळतं. मात्र तोपर्यंत या ट्रॅक्टरने बरंच नुकसान केलेलं असतं.



हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला शेकडोच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले आहेत.