TRAI New Rule From 1 November 2024: साधारण दशकभराच्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा झपाट्यानं झालेला विकास कायमच चर्चेचा विषय ठरला. याच तंत्रज्ञानामुळं अनेक कामं सुकर झाली. तर, काही बाबतीत मात्र याच तंत्रज्ञानानं चिंतेत भरही टाकली. सायबर क्राईमची वाढली प्रकरणं हे त्याचच आणखी एक उदाहरण. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राईमच्या प्रकरणांमध्ये झपाट्यानं वाढ झाल्यामुळं आता त्यावर आळा घालण्यासाठी म्हणून शासनानं काही पावसं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India) ही यात मागं नाही. नुकतंच TRAI कडून टेलिकॉम ऑपरेटर संस्थांना सिमकार्ड युजर्सचा डेटा अर्थात खासगी माहितीसंदर्भातील गोपनीयता राखण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याचे निर्देश दिले आहेत. 


केंद्राच्या या निर्णयामुळं रिलायन्स दिओ, वोडाफोन, आयडिया, एअरटेल आणि बीएसएनलच्या युजर्सना स्कॅमरपासून आपला टेडा सुरक्षित ठेवणं शक्य होणार आहे. सिमकार्डशी संबंधित हा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. फेक कॉल आणि टेलिकॉम ऑपरेटर्सच्या फेक कॉलवर आळा घालण्यासाठीचे हे निर्देश 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. 


केंद्र शासनाच्या या नियमानुसार तुमच्या फोनवर येणाऱ्या कॉल आणि मेसेजची सर्वप्रथम ऑपरेटरकडून पडताळणी केली जाईल. या नंबरमधील काही कीवर्डची माहिती घेत त्यातील मेसेज आणि कॉल तातडीनं ब्लॉक करण्यात येतील. सिम कार्ड युजरनं तक्रार केल्यास ते मेसेज आणि कॉल ब्लॉक करण्यात येतील. येत्या काळात हीच प्रणाणी फेक कॉलवर आळा घालणार असून, सायबर क्राईमच्या विरोधातील एक महत्त्वाची मोहिम ठरणार यात शंका नाही. 


हेसुद्धा वाचा : 11940000000 रुपयांची कमाई आणि ती ही एका महिन्यात! सर्व सामान्यांमुळे महाराष्ट्र सरकार मालामाल


 


प्रत्येक नव्या महिन्यामध्ये नवे बदल आणि नियम लागू होतात. यंदाच्या नोव्हेंबर महिन्यातही असेच काही बदल लागू झाले असून, त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन आयुष्यावर आणि त्यांच्या खिशावरही होताना दिसतो. टेलिकॉम कंपन्यांचा हा नियमही त्यातीलच एक.