भारतात जन्म घेतोय एक नवा ग्लेशियर; नैसर्गिक क्रियेचा वेग पाहून शास्त्रज्ञही हैराण
Uttarakhand glacier : अविश्वसनीय... भारतात `या` ठिकाणी वेगानं वाढतोय ग्लेशियर; शास्त्रज्ञही हैराण. संशोधनातून समोर आली अनपेक्षित माहिती....
Uttarakhand glacier : भारतात काही ठिकाणांना पर्यटकांची सुरुवातीपासूनच पसंती असल्याचं पाहायला मिळालं आहे. यातलंच एक ठिकाण असंही आहे, जिथं असणारं पर्वतीय क्षेत्र निसर्गाचं एक वेगळं रुप कायमच इथं येणाऱ्यांना थक्क करतं. आतासुद्धा एका अशाच घटनेमुळं देशातील हा कमाल भाग प्रकाशझोतात आला असून, शास्त्रज्ञसुद्धा यामुळं अवाक् झाले आहेत. कारण, भारतात एक ग्लेशियर जन्मास येत असून त्याचा वेग अतिशय भारावणारा असल्याचा शोध नुकताच लागला आहे.
कुठं जन्मास येतोय नवा ग्लेशियर?
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील धौलीगंगा खोऱ्यात असणाऱ्या दोन ग्लेशियरच्या मध्ये एका नव्या ग्लेशियरचा जन्म होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. हा ग्लेशिरय अतिशय वेगानं वाढत असल्यामुळं शास्त्रज्ञसुद्धा हैराण झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार भारत आणि चीनच्या सीमेनजीक LAC पासून ग्लेशियर अतिशय जवळ आहे. या ग्लेशिरचा आकार 48 चौरस किमी असून, त्याचं अचूक Location निती वॅलीमध्ये असणाऱ्या Randolph आणि रेकाना या ग्लेशियरच्या क्षेत्रात असल्याचं सांगितलं जात आहे.
सदर ग्लेशियरचं निरीक्षण केलं असता 7354 मीटर उंच अबी गामी आणि 6535 मीटर उंच गणेश पर्वतादरम्यानच्या 10 किमीच्या क्षेत्रामध्ये हा नवा ग्लेशियर जन्माला येत आहे. ग्लेशोयोलॉजिस्ट आणि हिमालयन तज्ज्ञाच्या अभ्यासपर निरीक्षणातून ही बाब समोर आली. जिथं हा ग्लेशियर आकारास येत आहे तिथं पोहोचणं अशक्य असल्यामुळं तूर्तास उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्रांतून त्यासंदर्भातील माहिती मिळत आहे.
हेसुद्धा वाचा : रतन टाटा यांच्या निधनानंतर शांतनू नायडू काय काम करतोय? स्वत:च सांगितलं...
राहिला मुद्दा ग्लेशियरचं इतकं महत्त्वं काय? याबाबतचा, तर ग्लेशियरचा आकार वाढल्यामुळं त्या क्षेत्रातील वातावरणासंदर्भातील माहिती सहजगत्या उपलब्ध होते. तर, पर्यावणविषयक आराखडे किंवा पर्यावरण संरक्षणासाठीची पावलं उचलणं अधिक सोपं होतं. वर्षानुवर्षे चालणाऱ्या या नैसर्गिक प्रक्रियेदरम्यान पृथ्वीच्या उदरात नेमक्या कोणकोणत्या हालचाली सुरू आहेत यासंदर्भातील सखोल माहितीसुद्धा मिळण्यास मदत होणार असून, भारतातील या नव्या ग्लेशियरची प्रत्यक्ष छायाचित्र पाहणं महत्त्वाचं ठरेल.