Raksha Bandhan Market  - बहीण-भावाच्या पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये राखी खरेदी करण्यासाठी बहिणींची गर्दी पाहिला मिळते आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझायनच्या राख्या आल्या आहेत. फॅन्सी डिझायनच्या राख्यांनी महिलांना भुरळ घातली आहे. मात्र या राख्यांसाठी यंदा महिलांना त्यांची पर्स रिकामी करावी लागणार आहे. 


दिल्ली आणि कोलकातामधून येतात राख्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देशात दिल्ली आणि कोलकातामधून राख्या या मार्केटमध्ये येतात. महागाई वाढली असली तरी स्टोन (Stone), जरकन (Zirkan) आणि मेटलच्या (Metal) राख्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कलवासह रुद्राक्षसह विविध फॅन्सी राख्यांना खूप मागणी आहे. त्याशिवाय गणपती आणि लक्ष्मीच्या राख्यांनाही मोठी मागणी आहे. या राख्या 15-20 रुपयांपासून 200-3000 रुपयांपर्यंत मिळणार आहेत. 


छोटा भीम आणि एंग्री बर्डला मागणी


तर यंदाही लहान मुलांच्या राख्यांमध्ये छोटा भीम आणि एंग्री बर्डच्या राख्यांना पसंती मिळतं आहे. कार्टूनवाली राख्यांचे भाव वाढले आहे. छोटा भीम, एंग्री बर्ड, डोरेमान, लाइटवाली राख्यांना मोठी मागणी आहे. 


15-2000 रुपयांपर्यंत राखी


फॅन्सी राख्यांशिवाय चांदीच्या राखीच्या किमतीत वाढ झाली आहे. मार्केटमध्ये राख्या 15 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत मिळतं आहेत. 


राखींचे प्रकार आणि दर 


साधी आणि स्पिनर लायटिंग -  40 ते 65 रुपये
उडन  - 30  ते 40 रुपये
कुंदन वर्क - 20  ते 110 रुपये
मोती - 10  ते 50 रुपये
जरदोशिवर - 30  ते 35 रुपये
चिडा, लुब्बा - 22  ते 50 रुपये
कपल राखी - 40 ते 50 रुपये
पपेट - 50 ते 60 रुपये
कडा -165 रुपये
देवराखी एक डझन - 5  रुपये
चांदी पॉलिश राखी - 100 रुपये