मुंबई : झारखंडमधील (Jharkhand)  जमशेदपूर येथे (Jamshedpur) गणेश चतुर्थीनिमित्त आधार कार्डच्या (Aadhaar card) आकारात एक मंडप तयार करण्यात आला. या आधार कार्डमध्ये गणपतीचा कैसालमधील पत्ता आहे. गणपतीची जन्म तारीख ही सहाव्या शतकातील देण्यात आली आहे. 


आणखी वाचा : 'जो चार लोकांसमोर आपलं नाव घेऊ शकत नाही....', जेव्हा रेखा यांच्यावर जया बच्चन संतापल्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार कार्डमध्ये एक कट-आउट आहे तयार करण्यात आलं आहे, ज्यामध्ये गणेशाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. तर आधार कार्डवर असलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर, स्क्रीनवर बाप्पाच्या दर्शनासाठी एक Google लिंक दिसते. या आधार कार्डवर दिलेला पत्ता श्री गणेश पुत्र महादेव, कैलास पर्वत, वरचा मजला, मानसरोवर जवळ, तलाव, कैलास पिनकोड-000001 आणि जन्म वर्ष 01/01/600 CE असा आहे.



या गणेश मंडपाचं आयोजक, सरव कुमार यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, त्यांना कोलकाता येथे फेसबुक थीम असलेलं मंडप पाहिल्यानंतर त्यांना हा आधार कार्ड-थीम असलेला मंडप बनवण्याची कल्पना सुचली. सरव कुमार म्हणाले, 'एकदा मी कोलकात्याला गेलो होतो, तेव्हा तिथे फेसबुकचा मंडप दिसला. मीही गणेशपूजा करत असल्यानं काहीतरी वेगळं करावं, असं मनात आलं आणि या मंडपाची कल्पना आली.'


आणखी वाचा : अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरमुळे गोंधळ; ट्विंकलनं पतीकडून घेतलं 'हे' वचन


कुमार यांना या वेगळ्या मंडपाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा संदेश देण्याचा हेतू आहे. ज्यांनी आधार कार्ड बनवलेलं नाही, त्यांनी ते लवकरात लवकर बनवायवा हवं, कारण हे एक महत्त्वाचा कागदपत्र आहे, असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.


आणखी वाचा : सोनाली फोगाट लेकीसाठी सोडून गेल्या कोट्यवधीची संपत्ती, तिच्या जीवालाही धोका


ते म्हणाले, जेव्हा देवाकडे आधार कार्ड असू शकतं, त्यामुळे कदाचित ज्या लोकांनी त्यांचं आधार कार्ड बनवलेलं नाही ते प्रेरित होऊन त्यांचे अनुसरण करू शकतात.' बरेच लोक या वेगळ्या थीमचे दर्शन घेत आहेत, एवढंच काय तर ते सेल्फी क्लिक करत असल्याचे दिसते. 


आणखी वाचा : तू आता Underwear घातलीयेस का? Karan Johar चा टायगरला विचित्र प्रश्न


गणेश चतुर्थीचा सण भारतात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि हजारांच्या संख्येनं भक्त मंदिरात आणि 'गणेशोत्सव मंडपात' दर्शन करण्यासाठी येतात. कालपासून सुरू झालेला हा दहा दिवसांचा शुभ उत्सव चतुर्थीला सुरू होऊन अनंत चतुर्थीला संपतो.