अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरमुळे गोंधळ; ट्विंकलनं पतीकडून घेतलं हे वचन

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

Updated: Sep 1, 2022, 02:02 PM IST
अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरमुळे गोंधळ; ट्विंकलनं पतीकडून घेतलं हे वचन title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आज प्रियांका तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा देसी गर्ल तिच्या अफेअरबद्दल चर्चेत होती. 'अंदाज' आणि 'ऐतराज'च्या काळात खिलाडी कुमार अक्षय कुमार यांच्यातील पडद्यावर असलेली केमिस्ट्री  ही ऑफ-स्क्रीन देखील दिसू लागली होती. त्यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा ही सुरु झाली. पण त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपच्या बातमीला कधी दुजोरा दिला नाही.

आणखी वाचा : सोनाली फोगाट लेकीसाठी सोडून गेल्या कोट्यवधीची संपत्ती, तिच्या जीवालाही धोका

अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाला जेव्हा त्यांच्या या विषयी कळले तेव्हा चांगलाच गोंधळ झाला. त्यानंतर ट्विंकलनं अक्षयला प्रियांका चोप्रासोबत कधीही काम करणार नाही असं वचन घेतलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या घटनेनंतर ट्विंकलने ही प्रियंकाला अक्षय कुमारपासून दूर राहण्यास सांगितले होते. रिपोर्ट्सनुसार, ट्विंकलही चित्रपटाच्या सेटवर पोहोचली होती जिथे अक्षय-प्रियांका यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. यानंतर अक्षय आणि ट्विंकलमध्ये मोठा वादही झाला होता. 

आणखी वाचा : तू आता Underwear घातलीयेस का? Karan Johar चा टायगरला विचित्र प्रश्न

अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं एकमागे एक चित्रपट दिले. या चित्रपटांमध्ये 'बच्चन पांडे, 'पृथ्वीराज' आणि 'रक्षा बंधन' सारखे चित्रपट आहेत. आता त्याचा 'कठपुतली' हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी OTT वर प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय 'राम सेतु', 'सेल्फी', Soorarai Pottru चा हिंदी रिमेक, OMG 2 आणि Jolly LLB 3 देखील आहे.