मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) या दोघांच आयुष्य 'कुली' चित्रपटात झालेल्या अपघातानंतर बदलले. या काळात बिग बी आणि जया एकमेकांच्या जवळ आले आणि दुसरकडे रेखा या एकट्या पडल्या. मूव्ही मॅगझिनच्या बातमीनुसार, अमिताभ हॉस्पिटलमध्ये जीवनाशी लढा देत असताना रेखा (Rekha) यांनी त्यांच्या 'उमराव जान' चित्रपटाच्या प्रीमियरचे आयोजन केले होते. त्यांनी स्वतः सर्वांना निमंत्रणपत्रेही पाठवली. पण कोणताही लोकप्रिय सेलिब्रिटी तेथे आला नाही.
अमिताभ यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे या पार्टीला काही अर्थ नव्हता. यावर रेखा म्हणाल्या, 'प्रत्येक गोष्टीसाठी माझ्यावर आरोप केले जात असल्याचं दिसतं. विशेषतः अशा वेळी जेव्हा लोकांना माझ्याबद्दल सहानुभूती वाटायला हवी होती. पण यापेक्षा वाईट काळ माझ्यासाठी दुसरा नव्हता.'
नेहमी कमी बोलणाऱ्या जया यांनी देखील त्यांचं वैवाहिक जीवनात सगळं काही ठीक आहे, असं सांगितले. जया म्हणाल्या पुरुषाचे विवाहबाह्य संबंध असले आणि तुमचं लग्न हे मोडलं नाही. पण तो असं म्हणतो की मी अडकलो आहे, कारण त्याची बायको खूप वाईट आहे वगैरे, तरीही संपूर्ण घर एकत्र आहे. त्याची मुलं मोठी होतं आहेत. आयुष्यात सर्व काही चांगलं आहे, प्रगती होत आहे, तो योग्य वेळी घरी येतो. तर अशा परिस्थितीत तुम्हाला स्वतःचा अंदाज येत नाही का? हे लगेच समजायला हवं ना?
जया पुढे म्हणाल्या, हा मी ऐकूण आहे की कशा प्रकारे प्रत्येक 'दुसरी स्त्री' विवाहित पुरुषाच्या प्रेमात असते. मी ते समजून घेण्याचं नाटक करू शकत नाही. मी कोणासोबत मजबूरी म्हणून प्रेमात राहिले नाही. मी माझ्या आयुष्यात किंवा माझ्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात असं काही करू शकत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक प्रामाणिक व्यक्ती असचं करेल.
दरम्यान, रोज रात्री घरी जाणारा माणसाला तुम्ही कसं स्वीकारू शकता? तुम्ही स्वतःला इतक्या खाली कसं आणू शकता? जेव्हा तुम्ही चार लोकांमध्ये उघडपणे त्या व्यक्ती विषयी सांगू शकत नाही आणि चार लोकांमध्ये त्यांचं नाव घेऊ शकत नाही. मग तुम्ही अशा नात्यात का आहात?