#TunishaSharma : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' मध्ये (ali baba dastaan e kabul) शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा नं (Tunisha Sharma news) अचानक जगाचा निरोप घेतला. कोणाच्या धानीमनी नसताना वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषा शर्माने मृत्यूला कवटाळलं. या प्रकरानंतर तुनिषा शर्माचा (Tunisha Sharma) खास मित्र आणि 'अली बाबा' मालिकेतील अभिनेता शीजान खान याला अटक करण्यात आली आहे. मात्र आता या आत्महत्येसंदर्भात मोठी माहिती समोर आली असून,  श्रद्धा (Shraddha Murder Case Updates) आणि आफताबच्या केसनंतरच तुनिषासोबत ब्रेकअप केल्याचं शीझान खानने म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी शीझान खानने (Sheezan Khan) तसं सांगितल्याची माहिती दिली असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अली बाबा दास्तान-ए-कबुल' (Ali Baba Dastaan-e-Kabul)  या मालिकेचे शूटिंग जून 2022 पासून सुरू आहे. तुनिषा शीजानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण 15 दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले, त्यामुळे अभिनेत्री तणावात होती. या प्रकरणी पोलीस त्याच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत असताना तुनिषा शर्माचा खास मित्र शीझान खान याने पोलिसांसमोर मोठा खुलासा केला आहे. श्रद्धा आणि आफताबच्या केसनंतरच तुनिषासोबत ब्रेकअप केल्याचं शीझान खानने (Sheezan Khan) म्हटले आहे. तुनिषाला नेहमी वाटायचे की, आपली देखील श्रद्धा वालकर प्रमाणे हत्या होऊ शकते अशी शक्यता त्यात पोलिसांनी वर्तवली आहे.


वाचा : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबविरुद्ध पोलिसांच्या हाती मोठा पुरावा 


शिजाननं तुनिशासोबत ब्रेकअप का केले? पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रश्नाच्या उत्तरात आरोपीने पोलिसांना सांगितले की, श्रद्धा खून प्रकरणानंतर तुनिशा खूप तणावाखाली होती. त्यामुळे ती तणावात होती. शीजनने सांगितले की, वय आणि धर्माचा हवाला देत त्याने तुनिशासोबत लग्न करण्यास नकार दिला आणि ब्रेकअप झाले.  


दरम्यान श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर (shraddha murder case) हिंदू आणि मुस्लिम असा वाद निर्माण झाला होता. म्हणूनच तुनिषाला ब्रेकअप केलं, असा दावा शीझानने केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता तुनिषा शर्माच्या आत्महत्येमागे लव्ह जिहाद आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. वालीव पोलिसांनीही आता यामागे लव्ह जिहाद आहे का या अँगलने तपास सुरु केल्याची माहिती एनएनआयने दिली आहे.