झारखंडमध्ये सुरक्षादलाकडून २ नक्षलवाद्यांचा खात्मा
घटनास्थळी सुरक्षादलाकडून शोधमोहिम सुरू
गुमला : झारखंडमधील गुमला जिल्ह्यात झालेल्या सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाल यश आले आहे. घटनास्थळावरून दोन एके-४७ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. या भागात सर्च ऑपरेशन सुरू असून आणखी काही नक्षलवादी लपले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांना गुमला जिल्ह्यातील कामडारा पोलीस भागात काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. या नक्षलवाद्यांकडून मोठा कट रचला गेल्याची माहिती मिळाली होती. नक्षलवादी लपले असलेल्या घटनास्थळी सुरक्षाजवानांकडून घेराव घालण्यात आला होता. नक्षलवाद्यांना शरण येण्यास सांगितले. परंतु, सुरक्षादलाने घातलेल्या घेरावानंतर नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यांना प्रत्युत्तर देत सुरक्षादलाकडूनही गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूने करण्यात आलेल्या या गोळीबारात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात करण्यात आला. सुरक्षादलाकडून परिसरात शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यातही नक्षलग्रस्त झारखंडमधल्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात ५ नक्षलवादी ठार झाले होते. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. झारखंडमधील १९ जिल्हे नक्षलग्रस्त असून १३ जिल्हे अति संवेदनशील आहेत.