राममंदिरासाठी अयोध्येत दोन दिवसात जोरदार वादळ उठणार
अयोध्येत राममंदिरासाठी येत्या दोन दिवसात जोरदार वादळ उठणार, अशी शक्यता आता निर्माण झालीय.
अयोध्या : केंद्र सरकारने राममंदिरासाठी कायदा करावा, त्याला संसदेमध्ये शिवसेना पाठिंबा देईल असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. नोटाबंदी एका रात्रीत होऊ शकते, तर राममंदिर का नाही, असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधानांची इच्छा असेल तर ते काहीही करू शकतात, अशा शब्दांत त्यांनी भाजपाला छेडले. त्यामुळे अयोध्येत राममंदिरासाठी येत्या दोन दिवसात जोरदार वादळ उठणार, अशी शक्यता आता निर्माण झालीय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या अयोध्येमध्ये पोहोचणार असून या दौऱ्यामुळे मंदिर उभारण्यासाठी दबाव निर्माण होईल, असा दावाही राऊत यांनी केलाय. उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी मागितलीच नव्हती, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. २०१९मध्ये पुन्हा राममंदिराचं आश्वासन देत निवडणुकीला सामोरं जाणं शिवसेनेला मान्य नाही. त्यामुळेच 'पहले मंदिर फिर सरकार' अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी दिल्याचं राऊत म्हणाले.
अयोध्येत राममंदिरासाठी येत्या दोन दिवसात जोरदार वादळ उठणार, अशी शक्यता आता निर्माण झालीय. विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना या दोन्ही संघटना राममंदिराचा मुद्द्यावर अय़ोध्येत वातावरण तापू लागलंय. उद्या आणि परवा असा दोन दिवसांचा उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा आयोजित करण्यात आलाय. त्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येकडे निघाले आहेत. प्रत्यक्ष अयोध्येतही या दौऱ्याची जोरदार तय़ारी सुरू आहे. यानिमित्तानं आम्ही अयोध्यावासींची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गेली अनेक वर्ष रामलला तंबूत आहे. त्याला मुक्त करा अशी भावना ते व्यक्त करत आहेत.