UIDAI Aadhaar Card nation-wide drive : Unique Identification Authority of India (UIDAI) च्या वतीनं देशभरात असणाऱ्या Aadhaar operators ना आधार कार्ड आणि त्यासंदर्भातील नव्या प्रणालीबाबतच्या बदलांचं प्रशिक्षण देण्यासाठी एका उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये आधार नोंदणी, नव्यानं माहिती पुरवणं इथपासून आधार ऑथेंटिकेशनसंदर्भातील सविस्तर माहिती आणि प्रक्रियेशी त्यांची ओळख करून दिली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Aadhaar operators हे स्थानिक पातळीवर थेट नागरिकांच्या संपर्कात येऊन त्यांच्या नोंदणीपासून authentication पर्यंतच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावताना दिसतात. त्यामुळं संपूर्ण प्रक्रिया, मार्गदर्शक तत्त्वं आणि धोरणांची त्यांना माहिती असणंही तितकंच महत्त्वाचं. त्यामुळं हा उपक्रम आधार केंद्रांवरील Aadhaar operators साठी असला तरीही याचा फायदा नागरिकांनाच होणार आहे. 


कसा अपडेट कराल आधार कार्डावरील फोटो? 


दरम्यान एकिकडे आधार ऑपरेटर्ससाठी प्रशिक्षण उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतानाच तिथं नागरिकांसाठीही ही प्रक्रिया अधिक सोपी कशी करता येईल यावर केंद्राकडून भर दिला जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दूरध्वनी क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, लिंग, ईमेलआयडी, या आणि अशा demographic details संदर्भातील माहितीची पूर्तता करण्यासाठी नागरिकांना Aadhaar Enrolment centre मध्ये भेट द्यावी लागणार आहे. तिथं त्यांच्या हातांचे ठसे, फोटो इत्यादी आवश्यक गोष्टींची नोंद करून घेतली जाते. 


हेसुद्धा वाचा : उन्हाळा सुरू झाला रेsss; महाराष्ट्राच्या 'या' भागात Heat Wave चा यलो अलर्ट 


आधार कार्डवरील फोटो बदलायचा झाल्यास तुम्हाला नजीकच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही नेमकं काय करावं हे टप्प्याटप्प्यानं जाणून घ्या.... 


- जवळच्या आधार केंद्राला भेट द्या. 


- आधार केंद्रात भेट देण्याआधीच तिथं जाण्याची वेळ आणि तारीख निर्धारित करून घ्या. 


- आता तिथं गरजेची माहिती देत तुम्हाला देण्यात आलेला फॉर्म भरा. 


- आता आधारच्या वतीनं तुम्हाला मदत करण्यासाठी तिथं असणारे प्रतिनिधी तुमचा एक फोटो काढतील. 


- फोटो बदलण्यासाठी तुम्हाला तिथं 100 रुपये भरावे लागतील. शिवाय इतर कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार नाही. 


- फोटो आणि रक्कम ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पावती देण्यात येईल. 


- साधारण 90 दिवसांच्या कावावधीत तुमचा नवा फोटो आधार कार्डवर अपडेच झालेला असेल. तुम्ही नव्यानं अपडेटेड आधार कार्ड डिजीटल डॉक्युमेंटच्या रुपात डाऊनलोड करू शकता.