उन्हाळा सुरू झाला रेsss; महाराष्ट्राच्या 'या' भागात Heat Wave चा यलो अलर्ट

Maharashtra Heat Wave : मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्याअखेरीस राज्यातील तापमानाचा आकडा बहुतांश जिल्ह्यांमध्ये 40 अंशांच्याही पलीकडे गेल्याची नोंद करण्यात आली. 

May 12, 2023, 08:01 AM IST

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात सध्या अवकाळीनं विश्रांती घेतली असून, राज्यातील तापमानात एकाएकी लक्षणीय वाढ झाल्याचं लक्षात येत आहे. 

1/7

कोकणाला अलर्ट

Maharashtra Weather forcast heat wave yellow alert predictions latest update

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

2/7

उष्माघातापासून बचाव करा

Maharashtra Weather forcast heat wave yellow alert predictions latest update

पर्यटनाच्या हेतूनं किंवा इतर कोणत्याही कारणानं घराबाहेर पडण्यापूर्वी उन्हापासून बचावासाठीची सोय करूनच बाहेर पडा. 

3/7

तापमानवाढ

Maharashtra Weather forcast heat wave yellow alert predictions latest update

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार नाशिक, जळगाव, नंदुरबार, मुंबई, ठाणे, पालघर, धुळे या भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

4/7

महाराष्ट्रात उष्णतेची लाट

Maharashtra Weather forcast heat wave yellow alert predictions latest update

गुरुवारी जळगावमध्ये राज्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली., जिथं पारा 44.8 अंशांवर पोहोचला होता. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा 42 ते 45 अंशांपर्यंत पोहोचला होता. 

5/7

उष्णतेची लाट

Maharashtra Weather forcast heat wave yellow alert predictions latest update

मुंबई आणि पुण्यातही हीच परिस्थिती होती. तुलनेनं समुद्र जवळ असल्यामुळं मुंबईत आर्द्रता जास्त असल्यानं उष्णतेचा दाह अधिक जाणवला.   

6/7

महाराष्ट्र उकाडा

Maharashtra Weather forcast heat wave yellow alert predictions latest update

राज्यात सध्याच्या घडीला देण्यात आलेला उष्णतेच्या लाटेचा इशारा पाहता, नागरिकांनी सकाळच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये असं आवाहन यंत्रणांनी केलं आहे.   

7/7

महाराष्ट्र तापमान

Maharashtra Weather forcast heat wave yellow alert predictions latest update

उष्माघातापासून वाचण्यासाठी सूती कपड्यांचा वापर, पुरेसं पाणी पिणं, पाण्याचा अंश अधिक असणाऱ्या फळांचं सेवन करणं अशा उपाययोजना करण्याचं आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.