Union Budget 2022 | अर्थसंकल्पातून सर्वसामांन्यांना काय मिळणार? जाणून घ्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 1 फेब्रुवारीला आगामी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करणार आहेत.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 1 फेब्रुवारीला आगामी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामांन्यांना अनेक अपेक्षा आहेत. कोरोना आणि महागाई अशा दुहेरी समस्यामुळे सर्वसामन्य जनता अडचणीत आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार सर्वसामांन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये आयकरमधून सवलत, बचत आणि रेल्वे भाडं या सारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असू शकतो. (union budget 2022 Know what the common man can get in the budget)
आयकर नवीन स्लॅब आकर्षक बनवण्यासाठी त्यात काही सवलती जोडल्या जाऊ शकतात. नवीन स्लॅबमध्ये उच्च उत्पन्नाची मर्यादा 15 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते. नवीन स्लॅबमध्ये गृह कर्जातून मिळणाऱ्या सवलतींचाही समावेश होण्याची शक्यता आहे. जुन्या स्लॅबमधील काही बाबींमध्ये कर सवलत मर्यादेत वाढ करता येऊ शकते.
PPF सारख्या योजनांमध्ये वार्षिक ठेव मर्यादेत दुप्पटीने वाढ केली जाऊ शकते. सध्या यामध्ये जास्तीत जास्त 1 लाख 50 रुपये जमा करण्चाी मर्यादा आहे. या मर्यादेत 3 लाख रुपयांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. तसेच त्यावर जमा केलेल्या रक्कमेवर 80C अंतर्गत कर सवलतीची मर्यादा देखील वाढविली जाऊ शकते.
कोरोनामुळे आरोग्यावरील खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. त्यामुळे आरोग्य विम्यावर मिळणाऱ्या टॅक्स सवलतही वाढू शकते. यामुळे सर्वसामांन्यांना दिलासा मिळू शकतो.
वर्क टु होम करणाऱ्यांना दिलासा?
कोरोनामुळे वर्क टु होमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वर्क टु होममुळे कर्मचाऱ्यांना वायफाय, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कराव्या लागल्या. त्यामुळे वर्क टु होम संबंधित वस्तूंवरील करातून सरकार सवलत देऊ शकते.