Union Budget 2023 : अर्थसंकल्प 2023 (Budget 2023) सादर होण्याआधी केंद्रातील मोदी सरकारला (Modi Government) मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वस्तू आणि सेवा कराच्या (Goods and Service Tax) माध्यमातून 1.56 लाख कोटी वसूल केले आहेत. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीत जीसएटी संकलन 1.55 लाख कोटींहून अधिक झालं आहे. हे आतापर्यंतचं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक संकलन ठरलं आहे. 


ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत 2.42 कोटींचा जीएसटी परतावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थमंत्रालयाने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण GST महसूल 1,55,922 कोटी रुपये आहे. यामध्ये CGST 28,963 कोटी, SGST 36,730 कोटी, IGST 79,599 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 37,118 कोटींसह) आणि उपकर 10,630 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 768 कोटींसह) यांचा समावेश आहे.


चालू आर्थिक वर्षातील जानेवारी 2023 पर्यंतचा महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीतील GST महसुलापेक्षा 24 टक्के अधिक आहे. चालू आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाने 1.50 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही तिसरी वेळ आहे. एप्रिल 2022 मध्ये नोंदवलेल्या 1.68 लाख कोटी रुपयांच्या एकूण महसुलानंतर जानेवारी 2023 मधील GST संकलन हे दुसरे सर्वोच्च आहे.


ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत महिन्याच्या अखेरीस एकूण 2.42 कोटी GST परतावा भरण्यात आला. मागील वर्षी याच तिमाहीत ही रक्कम 2.19 कोटी होती. वर्षभरात करण्यात आलेल्या विविध धोरणात्मक बदलांमुळे हा बदल दिसून येत असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे.