तुम्हालाही 'सोलो ट्रॅव्हलिंग'ची आवड? महाराष्ट्रातील 'या' 10 ठिकाणांना नक्की भेट द्या

Visit Solo Travelling Places in Maharashtra : तुम्हीही सोलो ट्रव्हलर असाल तर महाराष्ट्रील खाली दिलेल्या ठिकाणांना भेट दिली पाहिजे. 

| May 24, 2024, 20:59 PM IST
1/10

अलिबाग

मुंबईकरांसाठी सुट्टीच्या दिवशी फिरण्याचं ठिकाण म्हणजे अलिबाग.. अलिबाग हे समुद्रकिनारा प्रेमींसाठी नंदनवन आहे. अलिबाग वरसोली, काशिद आणि किहीम हे इतर अनेक समुद्रकिनारे लोकप्रिय आहेत.

2/10

गोदा आरती - नाशिक

महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले नाशिक हे देशातील प्राचीन शहरांपैकी एक आहे. अनेक लोकं गोदा आरती पाहण्यासाठी नाशिकमध्ये येतात. गोदा आरती झाल्यावर मन अगदी प्रसन्न होईल.

3/10

गेटवे ऑफ इंडिया - मुंबई

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत तुम्ही कधीही येऊ शकता. मुंबईला आला तर मरीन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया, संग्रहालये आणि कलादालनांना भेट द्या. तसेच सिद्धिविनायक मंदिर, हाजी अली मशीद आणि माउंट मेरी चर्चला देखील तुम्ही भेट देऊ शकता.

4/10

बीबी का मकबरा

औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर समृद्ध वारशासाठी ओळखले जाते. सर्वात लोकप्रिय म्हणजे बीबी का मकबरा नावाचे स्मारकाला तुम्ही सोलो ट्रिपमध्ये पाहू शकता. ही प्राचीन दगडी वास्तू महाराष्ट्रातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी आहे.

5/10

माथेरानचे हिल स्टेशन

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून माथेरानचं नाव घेतलं जातं. तुम्हाला नेरळ-माथेरान टॉय ट्रेनमध्ये प्रवास करता येतो. साहसी लोक माथेरान आणि आसपासच्या विविध टेकड्यांवर ट्रेकिंग करू शकतात. 

6/10

शनिवारवाडा

एकट्याला प्रवास करायचा असेल तर पुण्यासारखं शहर नाही. मराठ्यांच्या इतिहासाने समृद्ध अशा पुण्यात तुम्ही शनिवारवाडा, लाल महाल, सारसबाग, तुळशीबाग आणि इतर ठिकाणं देखील स्वस्तात फिरू शकता.

7/10

पाचगणीचं वातावरण

पाचगणी हे महाराष्ट्रातील आणखी एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. विपुल नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या पाचगणीचं वातावरण तुम्हाला प्रसन्न करेल. पाचगणी नावाचा अर्थ पाच टेकड्या असा होतो.

8/10

महाबळेश्वरचं निखळ सौंदर्य

महाबळेश्वरचे निखळ सौंदर्य अनुभवण्यासाठी आर्थर पॉइंट, वेण्णा लेक, नीडल होल पॉइंट, कोयना वन्यजीव अभयारण्य आणि लिंगमाला धबधब्यांना भेट द्या.

9/10

लवासा - पुणे

लवासा या नियोजित शहराची रचना इटालियन शहर पोर्टोफिनोसारखी पहायला मिळते. खासगी असलेलं शहर डोंगरदऱ्या आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे.

10/10

कास पठार

सात टेकड्यांनी घेरलेल्या साताऱ्याला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक लोक जातात. पावसाळ्यानंतर अनेकजण खास कास पठार पाहण्यासाठी येतात. साताऱ्यात असताना सज्जनगड आणि अजिंक्यतारा ही इतर ठिकाणे पाहिली पाहिजेत.