महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर घनचक्कर! थरारक चढाई, जोखमीची पायवाट, बाजूला खोल दरी आणि...

Maharashtra Treks : घनचक्कर शिखर हे त्याच्या नावाप्रमाणेच अनोखे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

| May 24, 2024, 20:49 PM IST

Ghanchakkar : कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्येच महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. घनचक्कर असे या शिखराचे नाव आहे. हे शिखराची चढाई पर्यटकांना चक्रावून टाकणारी आहे.

1/8

 उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेत येणाऱ्या कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे.

2/8

घनचक्कर डोंगराकडे जाणारी पायवाट अतिशय जोखमीची आहे. यामुळे  वाटाड्या सोबत असेल तरच पुढे. 

3/8

घनचक्करची वाट ही शिरपुंजेच्या भैरवगडाच्या खिंडीतून पुढे जाते. खिंडीत  एक पाऊल बसेल एवढीच जागा आहे. बाजूला खोल दरी आहे.   

4/8

 शिरपुंजे गावापासून भैरवगड माथा आणि खिंडीपासून घनचक्करचा माथा आणि पुन्हा शिरपुंजे गावात पोहचण्यासाठी जवळपास पाच तास पायपीट करावे लागते, हे संपूर्ण अंतर आठ किलोमीटर इतके आहे.   

5/8

 घनचक्कर शिखर सर केल्यावर कधीही विसरता येणार नाही असे सुंदर निसर्ग सौंदर्य पहायाल मिळते. 

6/8

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर गावलदेव हे आहे. हे शिखर घनचक्कर आणि कात्राबाईची खिंड यांच्यामध्ये आहे.   

7/8

घनचक्कर शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची 1509 मीटर इतकी आहे.   

8/8

घनचक्कर हे महाराष्ट्रातल्या सर्वांत उंच शिखरांपैकी क्रमांक तीनचे शिखर आहे.