रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सोमवारी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीनंतर केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केला जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्षातील ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे सरकारकडून दीर्घकालीन परिणाम करणारी घोषणा होऊ शकते. कृषी किंवा लघू-मध्यम उद्योगासंदर्भात ही घोषणा असेल, असे सांगितले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मोदींनी सहा वर्षात चांगले निर्णय घेतले तशा चुकाही केल्यात'

याशिवाय, या बैठकीत भाजपमधील आगामी संघटनात्मक फेरबदलांविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या केल्या जातील. याशिवाय, सप्टेंबर महिन्यात केंद्रीय मंत्रिमडळाचाही विस्तार होऊ शकतो. त्यामुळे आजच्या बैठकीत या सगळ्यावर खल होण्याची शक्यता आहे. 


१ जूनपासून सुरू होणार 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजना, हे फायदे मिळणार

दरम्यान, केंद्र सरकारने नुकतीच Unlock 1 ची घोषणा केली होती. कोविड १९ नवीन नियमावलीत अनेक शिथिलता देण्यात आल्या आहेत. त्यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. १ ते ८ जून हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (Peak Point ) पोहोण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.