नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा coronavirus प्रादुर्भाव अतिशय झपाट्यानं वाढत असतानाच संपूर्ण देशामध्ये मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. ज्याअंतर्गत अनेक व्यवहार ठप्प झाले होते. शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांवरही याचे थेट परिणाम झाल्याचं पाहायाला मिळालं. लॉकडाऊनचे नियम बऱ्याच अंशी शिथील केल्यानंतर औद्योगिक क्षेत्राला पुन्हा गती मिळत असल्याचं पाहायला मिळालं. पण, शैक्षणिक क्षेत्रात ही गती काहीशी कमी दिसली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मात्र विद्यार्थ्यांच्या शालेय वर्षालाही तितकंच महत्त्वं देत केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. १५ ऑक्टोबरपासून देशातील शाळा टप्प्याटप्प्यानं सुरु होणार आहेत. ज्यामध्ये सुरुवातीला मोठे आणि त्यानंतर लहान वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या एसओपीचा निर्णय हा त्या राज्यानं आणि केंद्रशासित प्रदेशानं ठरवणं अपेक्षित असेल. 


मुख्य म्हणजे यामध्ये शाळांनाही मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. कोरोनाचं संकट आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षाच घेता फिजिकल डिस्टन्सचं पालन केलं जाणं, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेणं यावर शाळांकडून लक्ष जावं असं केंद्रीय मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 


मध्यान्न भोजनाच्या बाबतीतही ते बनवताना आणि विद्यार्थ्यांना देतानाही योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा पुन्हा सुरु होण्याची तारीख जाहीर झाली असली तरीही यामध्ये पालकांची महत्वाची भूमिका असणार आहे. ज्यामध्ये त्यांच्या परवानगीनंतरच विद्यार्थी शाळेला हजर राहू शकणार आहेत. 



 


शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाईन पद्धतीनं हजर राहण्याची पर्याय विद्यार्थ्यांपुढं असणार आहे. त्यामुळं येत्या काळात 'न्यू नॉर्मल' अंतर्गत शिक्षण पद्धतीतही काही अमूलाग्र बदल घडून आल्याचं पाहायला मिळणार आहे.